Wednesday, December 30, 2015

२८ एप्रिल १७४० : बाजीराव पेशवा पहिला

बाजीराव पेशवा पहिला 

समस्त मानवी इतिहासात एकही लढाई न हरलेला योद्धा म्हणून ज्यांची ख्याती आहे ते श्रीमंत बाजीराव बाळाजी पेशवे

हिंदवी स्वराज्य कीर्तीध्वजा अवघ्या भारतभर पसरविनाऱ्या आणि युगप्रवर्तक छ. शिवरायांचा वारसा खऱ्या अर्थाने
चालविणाऱ्या थोरल्या बाजीरावांचे आजच्या दिवशी निधन झाले.
बाळाजी विश्वनाथ भटांचा हा थोरलापुत्र. आपल्या सर्व सरदारांमध्ये मराठा साम्राज्याची आकांक्षा निर्माण करून ती सिद्धीस नेणारा आणि सहदिशांना मराठा सत्तेच्या नौबती वाजविणाऱ्या या प्रतापी बाजीरावाने स्वकर्तुत्वावर दिल्लीच्या राजकारणात प्रवेश केला. दाभाडे, निजाम व दिल्लीकरांशी झालेल्या लढाया, पालखेडची लढाई, डभई व भोपळची रणयुद्धे, बुंदेलखंड व औरंगबादचा रणसंग्राम ही थोरल्या बाजीरावाच्या पराक्रमाची ठळक स्थाने.
चिमाजी आप्पांसारखा पराक्रमी व मुस्तद्दी भाऊ, होळकर, शिंदे, पवारांसारखे पराक्रमी सरदार यांच्या बळावर बाजीरावांनी मराठा साम्राज्याचा लौकिक वाढविला.
मर्द त्या मराठी फौजा । रणकीर्ति जयांच्या गाव्या ।
तळहाती शिर घेवुनिया, चालुनि तटावर जाव्या ।
जणु घोंघावत मधमाशा, झणि मोहाळास बिलगाव्या ।
अशी वृत्ती मराठी फौजांत निर्माण करनाऱ्या या प्रतापी बाजीरावांचे निधन दी. २८ एप्रिल १७४० रोजी वयाच्या ४० व्या वर्षी नर्मदाकाठी 'रावेरखेडी' (मध्यप्रदेश) येथे झाला.
जन्माने ब्राह्मण असून देखील क्षात्रधर्म स्वीकारून थोरल्या छत्रपतींनी स्थापलेल्या स्वराज्याच्या सीमा रुंदावण्याचे महान कार्य केले; त्या राउंना त्यांच्याच महाराष्ट्रात मात्र फक्त 'मस्तानी' वाला बाजीराव म्हणून आठवले जाते.



 रा. घो. 



    थोरले बाजीराव पेशवे - विकिपीडिया

मात्र पडत्याकाळात इतर कोणाहीपेक्षा बाळाजीने त्यांची जास्त काळजी घेतली होती त्यामुळे शाहू महाराजांचा बाजीरावावर जीव होता. त्यांनी पेशवाईची वस्त्रे व शिक्के कट्यार थोरला म्हणजेच पहिला बाजीराव यास दिली. बाजीराव शिपाई होता.
पहिला बाजीराव - मराठी बातम्या - वेबदुनिया
मराठ्यांना नर्मदेपलीकडे नेऊन उत्तर दिग्विजय करणारा वीर म्हणून पहिल्या बाजीराव पेशव्यांचे नाव आदराने घ्यावे लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा पाया रचला आणि बाजीरावांनी त्यावर कळस चढविला असे म्हटले तर वावगे ...
पहिला बाजीराव पेशवा — विकासपीडिया - मुख्य

बाजीराव, पहिला. (१८ ऑगस्ट १७॰॰ – २८ एप्रिल १७४॰). दुसरा पेशवा व मराठेशाहीतील एक श्रेष्ठ सेनानी. बाळाजी विश्वनाथ भट या पहिल्या पेशव्याचा ज्येष्ठ मुलगा. आईचे नाव राधाबाई. बाजीरावाचे मूळ नाव विसाजी. बाजीराव बल्लाळ व थोरला बाजीराव या ...
बाजीराव पहिला - मराठी विश्वकोश
बाजीराव, पहिला : (१८ ऑगस्ट १७॰॰ – २८ एप्रिल १७४॰). दुसरा पेशवा व मराठेशाहीतील एक श्रेष्ठ सेनानी. बाळाजी विश्वनाथ भट या पहिल्या पेशव्याचा ज्येष्ठ मुलगा. आईचे नाव राधाबाई. बाजीरावाचे मूळ नाव विसाजी. बाजीराव बल्लाळ व थोरला बाजीराव या ...
मराठा संघर्ष - पेशवे व पेशवाई | 
 ही मराठ्यांची पहिली मोहीम. (स्वतंत्र न्हवती पण त्यामुळे उत्तरेतल्या वाटा समजल्या, राजकारण समजले). जाताना बाळाजीने आपल्या कोवळ्या पोराला ( पहिला बाजीराव उर्फ विश्वास राव) सोबत घेतले. सन १७१८. ) या मोहीमेत सामील होताना ...
पेशवाईतील पहिला पेशवा बाजीराव हा जेव्हडा ...
पेशवाईतील पहिला पेशवा बाजीराव हा जेव्हडा पराक्रमी आणि कर्तृत्ववान होता त्याच्या अगदी विरुद्ध असा शेवटचा पेशवा दुसरा बाजीराव होता असे म्हटले जाते.विचार...
श्रीमंत बाजीराव पेशवे - एक अजेय योद्धा
 पण शाहूमहाराजांनी स्वराज्याचा पेशवा म्हणून बाळाजी विश्वनाथ भट यांचा पुत्र विसाजी अर्थात बाजीराव यास .... पहिला बाजीराव, दुसरा बाजीराव, बाळाजी ऊर्फ नानासाहेब पेशवे अंताजी ऊर्फ चिमाजी अप्पा, रघुनाथ ऊर्फ राघोबादादा.
मराठा साम्राज्याचा दरारा उभ्या ...
 तेजस्वी राजे
 थोरले बाजीराव पेशवे (ऑगस्ट १८,१७००- एप्रिल २५, १७४०) हे मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांचे १७२० पासून तहहयात पेशवे (मुख्य प्रधान) होते. त्यांना थोरला बाजीराव किंवा पहिला बाजीराव या नावानेही ओळखले जाते.
मराठी इतिहास: साम्राज्य स्वप्नाची ...
 वडिलांबरोबर दिल्ली स्वारीवर बाजीराव गेला तेव्हा तो अवघा १८/१९ वर्षांचा होता. त्यावेळी दिल्लीतील मुघलांच्या साम्राज्याची अवस्था तसेच तेथील विस्कळीत परिस्थिती बाजीरावांनी खूप जवळून पहिली. लेखन, वाचन, हिशेब, घोड्यावर ...
२८ एप्रिल १७४० : बाजीराव पेशवा पहिला - काही ...
  #२८ एप्रिल १७४० : बाजीराव पेशवा पहिला. बाजीराव पेशवा पहिला. समस्त मानवी इतिहासात एकही लढाई न हरलेला योद्धा म्हणून ज्यांची ख्याती आहे ते श्रीमंत बाजीराव बाळाजी पेशवे. हिंदवी स्वराज्य कीर्तीध्वजा अवघ्या भारतभर ...