संजय सोनवणी (Sanjay Sonawani) |
Posted: 22 Jul 2016 08:59 PM PDT जर काही असे घडले असते तर आपण सुसंस्कृत देशाचे नागरिक आहोत हे दिसले असते. १) १९९० ला काश्मीरी पंडितांचे जे हत्याकांड आणि निर्वासन झाले याबाबत देशभरातील मुस्लिमांनी आक्रोश केला असता.... २) हिंदुंनीच बाबरी मशीद न पाडता न्यायालयीन आदेशाचा सन्मान ठेवला असता. ३) अखलाख प्रकरणात बहुसंख्य लोक त्याच्या बाजुने जसे उभे राहिले तसे मुस्लिमही बहुसंख्येने वेमुला किंवा अन्य कोणत्याही गैरैस्लामी अन्यायाविरुद्ध उभे राहिले असते . ४) साध्वी ते पार सा-या महंतांची अधार्मिक वक्तव्ये जशी बहुतेकांनी फेटाळली तशीच झाकिरची बेवकुफ वक्तव्ये मुस्लिमांनीच फेटाळली असती. ५) मी वैदिक हे स्वतंत्र धर्माचे आहेत, हिंदुंशी संबंध नाही हे म्हणू शकतो...मी आजही जीवंत आहे....केवळ व्यंगचित्र काढले म्हणून चार्ली हेब्दो प्रकरणी नृशंस हत्याकांड होऊनही किती मुस्लिम निषेध करायला सामोरे आले? जगभरचे आले कि नाही हे सोडून देवू...भारतातील किती आले? ६) भारतातील अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना संघ मान्य नाही व ते त्याबाबत बिनधास्त बोलतात. मी तर संघ हिंदुंचा नसून वैदिक धर्मियांचा आहे असे म्हणतो. किती मुस्लिम मिम किंवा भारतातील मुस्लिम तत्वज्ञानकेंद्रीत संघटनांचा जाहीर विरोध करतात? ७) आयसिसबद्दल भारतीय मुस्लिमांची नेमकी काय भुमिका आहे हे किरकोळ प्रतिक्रिया वगळता व्यापकपणे का दिसत नाही? ८) तथाकथित उच्चवर्णीय लोकांच्या वर्चस्वतावादाविरुद्ध महात्मा फुलेंच्या काळापासून जो रोष दिसून येतो तसा रोष अजलाफ मुस्लिमांचा अशरफांबद्दल का दिसून येत नाही? मुस्लिम धर्म चालवनारे अशरफ आहेत कि अजलाफ आहेत? कि दोहोंची मिलीभगत आहे आणि खाजगीत ज्याने त्याने आपली गुलामी स्विकारली आहे? ९) तथाकथित हिंदुंत एक वर्ग आहे जो मुस्लिमांचा द्वेष करतो. संघटनाही आहेत. काही कृतीही केल्या आहेत. पण आम्हीच त्यांच्या विरोधात तुमच्यापेक्षा जास्त रान उठवत असतो. या देशातील मुस्लिम हे भारतीय मुस्लिम आहे यावर मी आणि अगणित कितीतरी श्रद्धा ठेवतात. असंख्य मुस्लिमही अशीच भावना बाळगतात हा माझाही अनुभव आहे. पण राष्ट्रहिताच्या बाबी येतात तेंव्हा इमाम ते सामान्य मुस्लिम कोठे दडी मारतात? कि दारुल हरब नि दारुल इस्लम खाजगीत घट्ट डोक्यात बसला आहे? मग तुमच्या कोणत्याही भुमिकांवर विश्वास कसा ठेवायचा? १०) संशयाच्या वातावरणात मैत्र होत नसते. भुमिका स्पष्ट तर हव्यातच कृतीतुनही दिसायला हव्यात. धर्मांधांशीचा लढा, हिंदु/वैदिक असोत कि मुस्लिम, जोवर कृतीतुन सिद्ध करत नाहीत तोवर लढला जाणार नाही. तुमची आजवरची या लढ्याबाबतची कृती काय आहे? इतिहासात जायला नको...वर्तमानकाळात काय आहे? तर हे काही प्रश्न आहेत तर काही विधाने आहेत. मानवजातीला...किमन भारतियांना अमन-सुखात जगायचे असेल तर या विधानांची...प्रश्नांची एकदाची सोय लावावी लागेल. भारतीय घटना स्वतंत्रतावादी आहे. ती महनीय आहे. य स्वातंत्र्याचा उपयोग आम्ही बेवकुफांसारखा करणार असू तर उद्या घटना अंमलात राहीलच असे नाही. कोणाही बेवकुफ धर्मांधाचे सरकार येईल आणि घरोघर अखलाक नाहीतर अन्य कोणे मारला जाईल. आम्हाला आमचा देश मध्यपुर्व होऊ द्यायचा आहे काय यावर सर्वांनी विचार करावा. |
You are subscribed to email updates from संजय सोनवणी (Sanjay Sonawani). To stop receiving these emails, you may unsubscribe now. | Email delivery powered by Google |
Google Inc., 1600 Amphitheatre Parkway, Mountain View, CA 94043, United States |