sagarsharma0331 posted: " Undoubtedly, the biggest Asian cuisine food festival organised at one of the grand venue of Delhi @ Select City Walk mall, Saket, adjudged and enjoyed by many foodies and gourmands, not just the natives but the venue and the fest also attracted many f"
|
Saturday, October 31, 2015
Daily digest for November 1, 2015
Moon posted: ""Nature holds the key to our aesthetic, intellectual, cognitive and even spiritual satisfaction." ~ E. O. Wilson Nature in its full bloom is always a treat to the eye... what do you say? :) Published in response to the Daily Post Weekly Photo Ch"
|
[New post] desi Travel Digest – October 2015
Prasad Np posted: " [adsenseyu2] [adsenseyu1] Travel Blog Posts I loved reading in October - Sharing the desi Travel Digest October 2015 Ladies and gentlemen, boys and girls ( yes I know a popular airline uses this line, but remember this post is about sharing ) am I lovi"
|
Friday, October 30, 2015
संजय सोनवणी (Sanjay Sonawani)
संजय सोनवणी (Sanjay Sonawani) |
अनेक भाषांचे पितृत्व असलेली वैदिक भाषा Posted: 30 Oct 2015 05:18 AM PDT ऋग्वेद हे जगातील सर्वात प्राचीन धार्मिक साहित्य मानले जाते हे खरे नाही. गाथांची रचना ऋग्वेदपुर्व आहे असे भाषाविद मायकेल विट्झेल यांनी सिद्ध केले आहे. त्याहीपुर्वी इसपू २४०० मधील पिर्यमिडमद्ध्ये कोरलेले "पि-यमिड टेक्स्ट" (Piramid Texts) हे सर्वात प्राचीन व लिखित स्वरुपात असलेले धार्मिक साहित्य आहे. उलट ऋग्वेद व अवेस्त्याचा तसा पुरातनत्वाचा लिखित पुरावा काहीएक उपलब्ध नाही. ऋग्वेदाची भाषा ही मुळची होती तशीच उरलेली नसून तीवर अनेक वेळा संस्कार झालेले आहेत. त्याकडे वळण्याआधी वैदिक भाषेबद्दल विद्वानांची विविध मते काय आहेत हे आपण प्रथम पाहू. १) ऋग्वेदाच्या भाषेचे अवेस्त्याच्या भाषेशी निकटचे साम्य असून काही ध्वनी बदलले कि त्याचे सरळ वैदिक संस्कृतमद्ध्ये रुपांतर होऊ शकते. ....ऋग्वेदातील दहावे मंडल वगळता उर्वरित भागाचा अभ्यास केला असता असे लक्षात येते कि त्यावर अनेक संस्करणे झालेली असून ती उणे केली तर एकाच कोणत्यातरी शुद्ध भाषेचा संबंध लागतो. ऋग्वेदाच्या संपादकांनी अन्य धार्मिक साहित्याच्या भाषेला काही प्रमाणात तरी आपलेसे केलेले दिसते. अशा भाषिक उधारीची अनेक उदाहरणे ऋग्वेदात आहेत. ऋग्वैदिक व्याकरणही अशा भाषिक प्रदुषनाने दुषित असल्याचे अनेक संकेत मिळतात. वैदिक भाषा ही पाश्चिमात्य भाषा होती, जशी अवेस्त्याची ज्यात र आणि ल हे वर्ण मिश्र होऊन जातात. ऋग्वेदातील व्याकरणही दोन भाषांचा संघर्ष दाखवते असा जे. ब्लोख यांच्या वैदिक भाषेबद्दलच्या कथनाचा सारांश आहे. २) प्राकृत भाषांना कोणत्याही एकाच उगमापर्यंत नेता येत नाही. त्या किमान संस्कृत भाषेतून तर नक्कीच उगम पावलेल्या नाहीत, ज्याप्रमाणे भारतीय विद्वान आणि होप्फर, लास्सेन, ज्यकोबी वगैरे समजतात. वैदिक भाषेचा शब्दसंग्रह आणि व्याकरण हे प्राकृत प्रकृतीशी मिळते, अभिजात संस्कृतशी नाही, त्यामुळे संस्कृतमधुन प्राकृत भाषा विकसित झाल्या हे मत मान्य करता येत नाही असे रिचर्ड पिशेल स्पष्टपणे, अनेक उदाहरणे देत नमूद करतो. ३) प्राकृत भाषांतील अनेक शब्द व प्रत्यय संस्कृतपेक्षा वैदिक भाषांशी अधिक मेळ खातात. प्राकृत जर संस्कृत भाषेतून उत्पन्न झाली असती तर असे झाले नसते. वैदिक भाषा व प्राकृत भाषा पुरातन प्राकृतातुनच उत्पन्न झाल्या असाव्यात कारण त्याशिवाय असे साम्य आढळून आले नसते. वैदिक भाषेत ऋकाराऐवजी उकार, (वृंदऐवजी वुंद) अनेक ठिकाणी होणारा वर्णलोप (उदा. दुर्लभ ऐवजी दुलह) इत्यादि. वैदिक भाषा ही संस्कृताशी समकक्ष नसून प्राकृताशी समकक्ष अथवा प्राकृतसमान आहे असे हरगोविंददास टी. सेठ सप्रमाण दाखवून देतात. ४) अवेस्ता आणि ऋग्वेदाच्या भाषेमद्ध्ये तर ध्वनीशास्त्रदृष्ट्या पुष्कळ साम्य आहे. यज्ञ- यस्न, असूर-अहूर, देव-दएवा, सोम - हओम, सप्त - हप्त, मित्र- मिथ्र, मगवन- माघवन इत्यादि देवतानामांत तर साम्य आहेच पण अनेक मंत्रही ध्वनी बदलुन जसेच्या तसे वैदिक भाषेत रुपांतरीत करता येतात. मात्र इ व ओ या स्वरांचे अनेक प्रकार अवेस्तनमद्ध्ये होतात तसे ते वैदिक भाषेत होत नाहीत. फरक आहे तो वाक्यरचनेच्या व शब्दसंग्रहाच्या बाबतीत. शब्द समान असले तरी अर्थ विभिन्न झालेले दिसतात. सायनाच्या भाष्यानुसार जेंव्हा ऋग्वेदातील अनेक शब्दांचा अर्थ लावायला अडचण भासू लागली तेंव्हा पाश्चात्य विद्वानांनी अवेस्त्याच्या भाषेची मदत घेतली. अवेस्त्याची भाषा वैदिक भाषेला अधिक निकटची आहे याबाबत आता कोणाही विद्वानाच्या मनात शंका नाही. किंबहुना अवेस्ता आणि ऋग्वेदाच्या धर्मकल्पनांतही कमालीचे साम्य आहे. ५) अवेस्त्याची भाषा ही वैदिक भाषेपेक्षा अधिक पुरातन आहे असे मायकेल विट्झेल यांनी सिद्ध केले असून ऋग्वेदाच्या मुळ भाषेवर किमान पाच संस्कार झाले असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. ६) ऋग्वेदातील १०. ७१.१-२ या ऋचांवरुन स्पष्ट दिसते कि वैदिक ऋषींनी नवीनच भाषा बनवली. जसे धान्य पाखडले जाते त्याप्रमाणे शब्द पाखडून भाषा बनवली असे ऋषी या ऋचांत म्हणतो. अनेक बोलीभाषांतून शब्द घेत ही नवी भाषा बनली असल्याचे निर्णायक पुरावे ऋ. ८.१.५.५ आणि ८.९५.५ या ऋचांतही मिळतात. पाश्चात्य विद्वानांनी संस्कृत आधी व प्राकृत बोलीभाषा हा क्रम दिला तो चुकीचा आहे असे मत डा. प्रमोद पाठक यांनी मांडलेले आहे. ७) म्यक्समुल्लर म्हणतात, "ऋग्वेदातील दहाव्या मंडलातील पुरुषसूक्त हे भाषा आणि आशयाने खूप नंतरचे आहे. वसंत, ग्रीष्म हे ऋतू ऋग्वेदात अन्यत्र उल्लेखले गेलेले नाहीत. शूद्र शब्दही अन्यत्र येत नाही." (A History of Ancient Sanskrit Literature", by F. Max Muller, 1859, page 570) याचा अर्थ एवढाच कि या सुक्ताची रचना वैदिक लोक/प्रचारक भारतात आले व वैदिक भाषेत सुधारणा करण्याच्या अंतिम टप्प्यात, ती अधिक सुडौल बनवल्यानंतर झाली आहे. कोलब्रुकसुद्धा म्हणतात कि या सुक्ताची रचना वैदिक भाषेला अधिक संस्कारित व शुद्ध बनवल्यानंतर ही रचना झाली आहे. (Miscellaneous Essays, Volume 1, By Henry Thomas Colebrooke, see footnote, 1837, page 309) ८) ऋग्वैदिक भाषेत जवळपास ६% शब्द हे द्रविड, मुंड च कोल भाषेतून आलेले आहेत. वरील अल्प विवेचनावरून लक्षात येणारी महत्वाची बाब म्हणजे वैदिक भाषा ही संस्कृत नाही तर प्राकृताप्रमाणेच, पण एक स्वतंत्र, अनेक भाषांचा आधार घेत बनलेली भाषा आहे. सेठ म्हणतात त्याप्रमाणे ती भाषा कोणा एकाच प्राकृत भाषेतून निर्माण झालेली नाही, परंतु या भाषेवर स्थानिक प्राकृतांचा प्रभाव निश्चयाने आहे. परंतू ऋग्वेदाच्या धर्मकल्पना आणि ऋग्वेदाची भाषा यावर उत्तर अफगाणिस्तानात स्थापन झालेल्या पारशी धर्म व धर्मग्रंथाच्या भाषेचाही निकटचा संबंध असल्याने ऋग्वेदाची मुळ भाषा ही अवेस्त्याच्या निकटची, समकक्ष असणार हे उघड अहे. विट्झेल म्हणतात त्याप्रमाणे मुळ ऋग्वेदाच्या भाषेत अनेक वेळा बदल केले जात शेवटचे संस्करण हे इसपूच्या तिस-या शतकात किंवा त्याहीनंतर झाले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजेच ऋग्वैदिक भाषा ही मुळची अवेस्त्याच्या समकक्ष व भारतात आल्यानंतर त्यात मुर्घन्य वर्णांचा समावेश होत प्राकृत व्याकरण व शब्दसंग्रह घेत अनेक संस्करणांतुन गेलेली आहे. त्यामुळे वैदिक भाषेला आपण एकार्थाने मिश्र भाषा म्हणू शकतो. ऋग्वेद हा पठणपरंपरेने जसाच्या तसा जपला गेला असता तर हे भाषिक वैविध्य व तेही प्राकृत व अवेस्त्यासमान, पण प्राकृतही नव्हे किंवा संस्कृतही नव्हे, अशा वैदिक भाषेत आले नसते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात कि वैदिक भाषेत जे शब्दवैविध्य व रचनासैलत्व आहे ते पाणिनीच्या संस्कृतातून गायब झालेले आहे. वैदिक भाषेवर अवेस्त्याची भाषा, भारतातील तत्कालीन प्राकृत भाषा यांचा एकत्रीत प्रभाव स्पष्ट दिसतो. स्वभावत:च दोन्ही भाषांतील शब्दही ध्वनीबदल करत वैदिक भाषेत आलेले असल्याने शब्दवैविध्यही दिसते. म्हणजेच वेळोवेळी ऋग्वेदाच्या भाषेवर संस्कार करण्यात आले आहेत. ही भाषा स्वतंत्र नाही. तिचे पितृत्व अनेक भाषांकडे जाते. थोडक्यात अवेस्तन समकक्ष भाषेचा पाया घेत त्यावर इतर अनेक अन्य प्राकृत व द्रविड/मुंड/कोल या भाषांचे संस्कार करत जी अत्यंत वेगळी बनवली गेली ती (व नंतर वैदिकांनाही समजायला अवजड जायला लागली ती) सर्वस्वी नवीन व अर्वाचीन भाषा म्हणजे वैदिक भाषा! त्यामुळे ऋग्वेद निर्मितीपासून होते तसेच्या तसे पाठांतराने जतन केले गेले या दाव्याला काही अर्थ नाही. |
You are subscribed to email updates from संजय सोनवणी (Sanjay Sonawani). To stop receiving these emails, you may unsubscribe now. | Email delivery powered by Google |
Google Inc., 1600 Amphitheatre Parkway, Mountain View, CA 94043, United States |
[New post] November 2015 Calendar – Download Desktop Wallpaper
Prasad Np posted: "[adsenseyu1] [adsenseyu2] November 2015 calendar desktop wallpaper: Fishing Boats in Gulf of Thailand November 2015 is here and so is our November 2015 Calendar desktop wallpaper for download. While here in North India we are seeing the first cool"
|
[New post] Clicking Karwa Chauth Moon
Prasad Np posted: "[adsenseyu1] [adsenseyu2] Experiments with Karwa Chauth Moon So my experiments with photographing moon continues. Just like last year, this year also the Karwa Chauth Moon played spoil sport and defied all predictions by all the astronomy websites. But p"
|
[New post] Superhero Mom gets marhaba surprise at Dubai Airport #marhabasurprises
Prasad Np posted: "We all have our favorite superhero that we worship and want to follow, but none comes even close to a single mom that raised six kids while working full-time. Every mom is a superhero in the eyes of her kids, for only a mom can juggle between a job and ru"
|
Thursday, October 29, 2015
संजय सोनवणी (Sanjay Sonawani)
संजय सोनवणी (Sanjay Sonawani) |
Posted: 29 Oct 2015 07:45 AM PDT खरे तर वेद तीनच आहेत. सामवेदाला स्वतंत्र वेद मानता येत नाही कारण तो ऋग्वेदातील ऋचांचे गायन करण्याबाबतचा वेद आहे. अथर्ववेद तसे पहायला गेला तर ऋग्वेदविरोधीच आहे. तो विशेषकरून जादु-टोण्याची वेद आहे. या वेदात यतुकर्मे असून यज्ञोपयुक्त सुक्ते आजीबात नाहीत. ऋग्वैदिक देवतंचे स्थानही यात अध:पतीत झालेले आहे. यजुर्वेद मात्र पुर्णतया याज्ञिक कर्मकांडाने भरलेला आहे. यज्ञ ही वैदिकांची मुख्य धर्मसंस्कृती मानली तर अथर्ववेद त्यात मुळीच बसत नाही. आणि या वेदाला चवथा वेद उशीरापर्यंत मानले जातच नव्हते यातच या वेदाला वैदिकच किती मानत होते हे दिसते. अथर्वन ब्राह्मण भारतात आजही अत्यल्प आहेत एवढे सांगितले की पुरे. भारतात वेदाज्ञा, वेदमान्यता याचे स्तोम मध्ययुगात तरी खूप होते असे दिसते. किंबहुना भारतातील कोणत्याही विचारधारेला वेदमान्यतेचे नाटक करावे लागे. त्याखेरीज तत्कालीन विद्वान त्या तत्वधारेला महत्वच देत नसत! प्रत्यक्षात कोणत्या वेदमान्यता आहेत हे मात्र तपासून पहायचे कष्ट तत्कालीन विद्वानांनीही घेतलेले दिसत नाहीत. कारण- १) ऋग्वेदात समाजरचनेबाबत कसलेही दिग्दर्शन नाही. अगदी वर्णव्यवस्थेचेही. २) सामाजिक नीतिनियमांबाबत ऋग्वेद प्रचंड परस्परविरोधी आहे. म्हणजेच नैतिकतेचा मापदंडही ऋग्वेद नाही. ३) ऋग्वेदात अन्य विरोधी समाजघटकांबाबत अत्यंत हिंसक आणि विद्वेषी घोषणांची/कृत्यांची रेलचेल आहे. ४) ऋग्वेद सांख्य, वैशेषिक आदि तत्वज्ञानांच्या विरोधात आहे. ५) ऋग्वेद मुर्तीपुजेच्या विरोधात आहे. ६) यजुर्वेदात मुर्तीपुजेचा ठाम विरोध आहे. ७) ऋग्वेदात विवाह आणि अपत्यजन्म (त्यातही पुत्रजन्म) महत्वाचा आहे. संन्यास ऋग्वेदाला मान्य नाही. यापुढे जाऊन ऋग्वेद अथवा अन्य कोणताही वेद जे सांगत नाहे त्या धर्माज्ञा वेदमान्य म्हणून वैदिकांनी कोणत्या वैदिक अधिकाराने काढल्या हा खरा प्रश्न आहे. गुरू ही संकल्पना खुद्द वेदांत नाही. आश्रम संकल्पनाही वेदांत नाही. मग या संकल्पना वेदमान्य का मानल्या गेल्या? केवळ वैदिकांनी सांगितल्या म्हाणून? त्या नंतरच्या वैदिक धर्मातील सुधारणा असू शकतात असे आपण म्हणू. पण वेदमान्यता आहे तर वेदांतच मुळात त्याला आधार काय बरे? तो त्यांनी गुह्यसुत्रे ते स्मृत्यांतही दिलेला नाही. श्रौत हे वेदांनाच आधारस्तंभ मानणारे कडवे वैदिक तर स्मार्त हे स्मृत्यांनाच मुख्य आधारस्तंभ माननारे वैदिक! स्मार्तांनी पंचायतन घेतले तो त्यांचा नाईलाज. पण तात्विक आधारस्तंभ काय तर स्मृत्या. याबद्दल सविस्तर मी क्रमश: लिहिणंच...पण मुख्य प्रश्न हा आहे कि वेदमान्यता या गोष्टींत कोठे आहे? ऋग्वेदात जाती नाहीत. ऋग्वेदात वर्ण नाहीत. बरीचशी उपनिशदे वैदिक नाहीत तर वेदविरोधी आहेत. दर्शनांचीही तीच गत आहे. आणि ते तात्विक विरोध दूर ठेवले तरी अमुकला मान्यता तमुकला नाही असे वेदांत कोठेच नमूद नाही. मग वेदमान्यता ही यांची कल्पनाशक्ती होती काय यावरही विचार करायला हवा. हे प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत हे लक्षात घ्या. ज्या बाबींचा मुळात उल्लेखच वेदांत नाही त्या वेदमान्य कशा? वेदमान्य म्हणून वैदिकांसाठी अनुकरनीय कशा? आणि वैदिकांनीच वेदांत जे मान्य आहे ते अव्हेरले असेल (उदा. गोमांसभक्षण) तर ते तरी वैदिक राहिलेत काय? विचार करा. वैदिकतेचे स्तोम या देशात खूप माजवले गेलेले आहे. त्या स्तोमाने वैदिकांसह सर्वांचाच होम केला आहे. विचार करा! |
You are subscribed to email updates from संजय सोनवणी (Sanjay Sonawani). To stop receiving these emails, you may unsubscribe now. | Email delivery powered by Google |
Google Inc., 1600 Amphitheatre Parkway, Mountain View, CA 94043, United States |
[New post] The Selfie of Ravan Maker
Prasad Np posted: " That I love to travel is not a secret. Not only distant dream destinations, I love to explore my own city also. For last few years it is my ritual to click pictures of Ravana under construction in Tatarpur and Tagore Garden area of West Delhi. R"
|
Wednesday, October 28, 2015
वैदिक टोळ्यांतील आंतरिक संघर्ष
संजय सोनवणी (Sanjay Sonawani) |
Posted: 28 Oct 2015 05:43 AM PDT
वैदिक धर्माची सुरुवात एकाच टोळीत/जमातीत झाली नाही. ऋग्वेदाचा व त्यातील दैवतकल्पनेचा विकास हा अनेक टोळ्यांच्या दैवत संकल्पना पण यज्ञकेंद्रित होत एकत्र होत झाला. या ३०० ते ५०० वर्षांच्या काळात वैदिक टोळ्यांचेही आपापसातील संबंध बदलत राहिले. मित्र असलेल्या टोळ्या शत्रू बनत आपासात झगडलेल्या दिसतात. ऋग्वेदात एकंदरीत जवळपास ४८ टोळ्या शत्रू अथवा मित्रभावाने अवतरतात. ऋग्वेद मित्र टोळ्यांचा उल्लेख पंचजन असा करतो, पण या पाच टोळ्या नेमक्या कोणत्या हे कोठेही स्पष्ट नाही. यदू, तुर्वश, अनु, द्रुह्यु आणि पुरू या त्या पाच टोळ्या असाव्यात असा तर्क केला जात असला तरी या टोळ्या एकत्र अथवा आसपास राहत होत्या असे दिसत नाही. उदाहरणार्थ यदू-तुर्वंश यांचा नेहमी एकत्र उल्लेख येत असून या टोळ्या फार दुरुन वैदिकांच्या सहाय्यार्थ येत असत असे उल्लेख मिळतात. शिवाय दाशराज्ञ युद्धात या टोळ्या सुदासाच्या विरुद्ध लढलेल्या आहेत. तुर्वश/तुर्वायण नंतरच्या काळात वैदिक साहित्यात विद्वेषानेच उल्लेखले गेले आहेत. तुर्वश अर्थात तुराणी लोक वैदिकांच्या दृष्टीने नंतर शापित झाले याचे कारण त्यांनी सुदासाविरुद्ध युद्ध पुकारले असे म्यक्समुल्लेरही नोंदवतो.
पर्शुंचीही हीच गत आहे. पर्शु (पर्शियन) टोळ्यांनी वैदिक टोळ्यांना अनेकदा आश्रय दिला आहे. ऋषींना दानेही दिली आहेत. (ऋ. ८.६.४६) परंतू हेही लोक नंतर सुदासाविरुद्ध उभे ठाकलेले दिसतात. फार कशाला, पुरू म्हणवणारी टोळीही सुदासाच्या विरोधात गेली. सुदास हा तुत्सू टोळीचा. बहुदा त्याच्या काळात वैदिक धर्माचा तोच आश्रयदाता होता. त्याने दाशराज्ञ युद्धात या सर्व टोळ्यांचा पराभव केला. खंडण्या वसूल केल्या. या युद्धानंतर पुरुंचाही उल्लेख वैदिक साहित्यातून गायब होतो. शतपथ ब्राह्मण तर पुरुंना राक्षस व असूर म्हणुन निंदते. महाभारतात पुरुचे नांव अवतरते, पण टोळीचे म्हणून नव्हे तर ययाती-शर्मिष्ठेचा मुलगा म्हणून. या पुरुचा ऋग्वेदातील पुरू टोळीशी संबंध नाही. पुरू - पौरु हे पुरातन शब्द असून त्यांचा अर्थ पुष्कळ, पुरातन, पहिला माणूस वगैरे होतो. पुरु हे जसे टोळीनाम होते तसेच अनेकांच्या नावातील ते विशेषणही होते, मग ते वैदिक असोत कि अवेस्तन. उदा. पुरुमिळ्ह, पुरु आत्रेय, पुरुहन्म अशी नांवे ऋग्वेदात जशी येतात तशी अवेस्त्यातही येतात. उदा. झरथुष्ट्राच्या वडिलांचे नांव पौरुषास्प होते. पौरु-दाक्ष्ती, पौरु-बंघ, पौरु-चिस्त, पौरु-जिर वगरे पुरु-केंद्रित नांवे अवेस्त्यात अवतरतात. सोल लेव्हिन या भाषाविदाने पुरु-पौरु हे शब्द अतिपुरातन असल्याचे सिद्ध करुन दाखवले आहे. दोहोंचा अर्थ एकच! पुरु एके काळी ऋग्वैदिक धर्माचे आश्रयदाते होते, जसे यदू-तुर्वश वगैरे. परंतू नंतर हे संबंध पुर्ण बदललेले दिसतात. दाशराज्ञ युद्धामागे धार्मिक वर्चस्वतावादाचेच कारण होते असे काही विद्वान मानतात. उदाहरणार्थ हे दाशराज्ञ युद्धातील सुदासशत्रू "अयाज्ञिक" होते असे ऋग्वेदच सांगतो. शिवाय या दहापैकी पाच टोळ्या आर्य तर पाच अनार्य होत्या असेही नमूद आहे. येथे आर्य हा शब्द वंशवाचक नही हे स्पष्ट आहे. अग्नीपुजक लोक हे आर्य होते तर अन्य व्रत करणारे, इंद्राला अथवा देवांना न मानणारे ऋग्वैदिक लोकांच्या दृष्टीने अनार्य होते. तुर्वश हे सुरुवातीच्या काळात देवाच्या बाजुने होते. म्हणून ते वैदिक टोळ्यांचे मित्रही होते. तुर्वंश लोकांनीच झरथुष्ट्राचा खून केला हाही इतिहास आहे. ही घटना दोन्ही धर्मग्रंथांत नोंदली गेलेली आहे. हेच तुर्वश नंतर ऋग्वैदिक सुदासाच्याही विरुद्ध अन्य टोळ्यांबरोबर उभे ठाकले हाही इतिहास आहे. मग झरथुष्ट्राच्या मृत्युनंतर तुर्वश, अनू वगैरे टोळ्यांच्या धर्मभावनांत काही बदल झाला का? कि या युद्धाचे कारण धार्मिक नसून सर्वस्वी राजकीय होते? ऋग्वेद याबाबत काही भाष्य करत नाही. ही घटना झरथुष्ट्राच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी झालेली असल्याने अवेस्ता तर या युद्धाचा उल्लेखही परत नाही. असे असले तरी ऋग्वैदिक धर्माचा विकास सहजासहजी झाला नाही. ऋग्वेदरचना सलग चालू राहिली असेही दिसत नाही. सुरुवातीला ऋग्वैदिक धर्म यज्ञकेंद्रित असला तरी त्यातील कर्मकांडेही साधी होती. त्यांत अवडंबर नव्हते. ब्रह्मन, क्षत्र व विश हे शब्द अवतरत असले तरी ते वर्णवाचक नव्हते. मंत्रकर्ता कोनीही असो तो त्याक्षणी ब्राह्मण असे तर लढावे लागे तेंव्हा तो क्षत्रीय असे. विश म्हणजे ग्रामीण वसाहती व त्यात राहणारे लोक. अशी रचना अवेस्त्यातही होती. उदा. ब्राह्मण शब्दाऐवजी अग्नीपुजा करणारा तो अथ्रवण. योद्धा असेल तो रथेस्ट्रा. बाकी लोक दास. पण हे जन्माधारित नव्हते. याचे कारण म्हणजे ऋग्वैदिक धर्म हा टोळ्यांनी निर्माण केलेला धर्म. लोकसंख्याच मुळात मर्यादित होती. त्यात कर्मप्रधान अथवा जन्मप्रधान कायमचे वाटप करता येणे सर्वस्वी अशक्य होते. शिवाय या धर्माला आश्रय देणा-या टोळ्याही काळानुसार बदलत गेल्या. झरथुष्ट्राचा धर्म नंतर राजाश्रय मिळत गेल्याने झपाट्याने पसरतही गेला. अशा स्थितीत या धर्माचा निभाव लागणे प्राचीन इराणात सोपे राहिलेले नव्हते. त्या स्थित्यंतराकडे आपण नंतर जावू. पण ऋग्वैदिक काळात हा धर्म तुलनेने अत्यंत साधा होता हे येथे लक्षात घेऊ. इतर वैदिक संस्कारांपैकी फक्त तीन संस्कार या काळात जन्माला आलेले दिसतात. ऋग्वेदातील तत्वज्ञानही प्रचंड विरोधाभासने भरलेले दिसते. आधी श्रेष्ठ असनारा असूर वरून आपले स्थान गमवत इंद्र श्रेष्ठस्थानी पोहोचलेला दिसतो. वैदिकांना रुद्र, मरुत, विष्णू, भारती वगैरे शेकडो नवीन देवता सामाविष्ट कराव्या लागलेल्या दिसतात. आणि याच वेळेस देव विविध असले तरी अंतता: त्या एकच आहेत असे तात्विक समाधानही करून घ्यावे लागल्याचे दिसते. यात वैदिक ऋषींतील आंतरसंघर्षही डोकावत राहतो. अगस्त्याने मरुत व इंद्र यांच्यातील हवीचा फार मोठा संघर्ष कसा सोडवला याचे विवेचन मागील लेखात मी केलेलेच आहे. प्रदिर्घ काळात विविध मनोवृत्तीच्या व विविध धर्मांची पार्श्वभुमी असलेल्या लोकांनी बनवलेल्या धर्मात हा आंतरिक संघर्ष असणे स्वाभाविकच आहे. आता हा प्रश्न पडतो कि प्राचीन इराण (दक्षीण अफगाणिस्तान) येथे अशी काय स्थिती उद्भवली कि वैदिक धर्माला अन्यत्र आश्रय शोधावा लागला? अनेक विद्वान आर्य आक्रमण अथवा सामुहिक विस्थापनामुळे वैदिक धर्म भारतात आला असे मानतात, ते खरे आहे काय? काही लोक वैदिक धर्म भारतातच स्थापन झाला असे म्हणतात, त्यांच्या दाव्यात कितपत तथ्य आहे? वैदिक वंशावळ व महाभारतातील वंशावळ का जुळत नाही? अनेक प्रश्न आहेत. पण आपण एकामागून एक प्रत्यक प्रश्नाचा विचार करुयात! |
You are subscribed to email updates from संजय सोनवणी (Sanjay Sonawani). To stop receiving these emails, you may unsubscribe now. | Email delivery powered by Google |
Google Inc., 1600 Amphitheatre Parkway, Mountain View, CA 94043, United States |