आयुर्वेदीय गर्भसंस्कार
गर्भ संस्कार मंत्र मराठी
आहारात कोणत्याही प्रकारची कमतरता
राहिल्यास त्या आवश्यक पोषकतत्त्वांपासून गर्भ वंचित राहतो. त्याचा परिणाम
गर्भाच्या वाढीवर होऊ शकतो. कधी अचानक गर्भपात होऊ शकतो, तर कधी नियत
वेळेच्या आधीच बाळंतपण होऊ शकते. जन्मतः बाळाचे वजन कमी असू शकते किंवा
अशक्त प्रकृतीचे बाळ जन्मू शकते. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी गर्भवतीने
आहाराकडे विशेष लक्ष द्यायला हवे.योग्य बीजसंस्कार करून गर्भधारणेसाठी प्रयत्न केले की गर्भधारणा चटकन होण्यास मदत मिळते, नऊ महिने गर्भाचा विकास होणे शक्य होते आणि निरोगी, बुद्धिमान व जन्मतः सुसंस्कारित बाळ जन्माला येते. मात्र गर्भाधानसंस्कारानंतरची महत्त्वाची पायरी म्हणजे "गर्भसंस्कार‘.
गर्भधारणा होण्यापूर्वी स्त्रीबीज व पुरुषबीज निरोगी व संपन्न असणे आवश्यक असले तरी फक्त स्त्रीबीज व पुरुषबीजाच्या संयोगातून गर्भ राहू शकत नाही. आयुर्वेदातील या सूत्रावरून हे स्पष्ट होते,
शुक्रशोणितजीवसंयोगे तु खलु कुक्षिगते गर्भसंज्ञा भवति ।
...चरक शारीरस्थान
शुक्र (पुरुषबीज), शोणित (स्त्रीबीज) व जीव, जो चैतन्यतत्त्वाने युक्त असतो, यांचा संयोग झाल्यास गर्भधारणा होते. गर्भधारणा होते तेव्हा ते केवळ स्त्री-पुरुषाच्या शरीरातील भौतिक अंशाचे मिलन नसून, त्यात चैतन्यत्वाचेही मिलन असते. चैतन्यत्व हे कोणत्याही जडबंधनात नसते, तर ते स्वतंत्रपणे स्वेच्छेने अंतर्भूत होते. गर्भधारणा ही एक नैसर्गिक चमत्कृती मानली जाते, ती यामुळेच.
चैतन्याच्या पाठोपाठ येते ते मन !
तत्र पूर्वं चेतनाधातुः सत्त्वकरणो गुणग्रहणाय प्रवर्तते ।
...चरक शारीरस्थान
म्हणजेच फलन (फर्टिलायझेशन) झाल्याच्या क्षणापासून गर्भ मनाने युक्त असतो आणि या मनावर पूर्वजन्मातील चांगल्या वाईट कर्मांचे संस्कार असतात. मागच्या जन्मातील सात्त्विक, राजसिक वा तामसिक आचरणाचा परिणाम गर्भाच्या मनावर कायम असतो. गर्भारपणाच्या नऊ महिन्यांच्या कालावधीसह जन्मापूर्वीचा सर्वच काळ पूर्वजन्म गणला जातो. आई-वडील, त्यांचे पूर्वज यांचे गुण आपल्यात गुणसूत्राच्या रूपाने येतातच. गर्भाचे मन आपल्या आई-वडिलांच्या विशेषतः आईच्या मनाशी संबंधित असते, असे आयुर्वेदाने स्पष्ट केले आहे. चरकाचार्य म्हणतात,
गर्भ संस्कार मराठी
सत्त्ववैशेष्यकराणि पुनस्तेषां तेषां प्राणिनां मातृपितृसत्त्वान्यन्तर्वन्त्याः श्रुतयश्चाभीक्ष्णं स्वोचितं च कर्म सत्त्वविशेषाभ्यासश्चेति ।। ...चरक शारीरस्थानगर्भाचे मन आपापल्या आई-वडिलांच्या मनाशी युक्त असते. गर्भवती स्त्री ज्या प्रकारच्या कथा-वार्ता ऐकेल, जे काही गीत-संगीत ऐकेल त्याच्या अनुसार बाळाचे मन घडत जाते. जे काही गर्भवती एकचित्त होऊन ऐकेल ते सर्व गर्भाच्या मनावर संस्कार करीत असते.
गर्भोपपत्तौ तु मनः स्त्रिया यं जन्तु व्रजेत् तदृशं प्रसूते । ...शारंगधर
गर्भ संस्कार वीडियो
शूर,
हुशार, सुंदर व निरोगी गर्भाची इच्छा असणाऱ्या गर्भिणीने गर्भावस्थेत तशा
गुणांनी युक्त आदर्श व्यक्तींच्या कथा ऐकाव्यात, त्यांचे जीवनचरित्र
वाचावे, त्यांच्याबद्दल विचार करावा. गर्भसंस्कार ही संकल्पना यावरच आधारलेली आहे. गर्भारपणातील नऊ महिने म्हणजे गर्भसंस्कार करण्यासाठीचा सुवर्णकाळ आहे, असे म्हणायला हरकत नाही. गर्भसंस्कार जितके शास्त्रोक्त असतील आणि जितक्या तत्परतेने केले जातील, तितके जन्माला येणारे बालक सुसंस्कारित व सर्वगुणसंपन्न असते, स्त्रीचे स्वतःचेही आरोग्य व्यवस्थित राहते, असा अनुभव येतो.
गर्भसंस्कार हा विषय खूप मोठा आहे. सविस्तर माहितीसाठी "सकाळ‘ प्रकाशित "आयुर्वेदीय गर्भसंस्कार‘ हे पुस्तक आहेच. या ठिकाणी आपण गर्भसंस्कारातील काही महत्त्वाच्या गोष्टी थोडक्यात पाहू या.
"गर्भसंस्कार‘ म्हणजे एखादी पूजा किंवा एखादा दिवस निवडून गुरुजींकरवी करून घ्यायचा सोपस्कार नसतो, तर तो नऊही महिने बालकाच्या व गर्भवतीच्या संपूर्ण आरोग्यासाठी करावयाचा संस्कार असतो. यामध्ये गर्भवती स्त्रीचे योगदान मुख्य असले तरी घरातील सर्वच मंडळींचा, मित्र-आप्तेष्टांचाही सहयोग आवश्यक असतो. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ज्यांच्या साह्याने गर्भसंस्कार करायचे, ती सर्व साधने उदा. ध्वनिसंस्कारासाठीचे संगीत किंवा गर्भपोषणासाठीची रसायने, गर्भवतीच्या आरोग्यासाठीची औषधे वगैरे शास्त्रोक्त असणे आवश्यक असते. केवळ नावापुरते गर्भसंस्कार केले तर त्यांचा गुणही तसाच येणार, हे वेगळे सांगावयास नको. गर्भसंस्कारात पुढील मुद्दे महत्त्वाचे होत.
गर्भ संस्कार संगीत
- गर्भवती स्त्रीने आहार-आचरणात घ्यायची काळजी.
- गर्भविकासासाठी तसेच स्वतःच्या आरोग्यासाठी घ्यायची औषधे, रसायने.
- योगासने, गर्भावस्थेत ऐकायला हवे असे विशेष संगीत व ध्यान यांचा नियमित अभ्यास.
- नैसर्गिक प्रसूतीसाठी आवश्यक ती पूर्वतयारी.
गर्भवतीचा आहार
गर्भावस्थेत बाळाच्या आरोग्याची जडणघडण होत असते. या काळात आहाराकडे नीट लक्ष दिल्यास गर्भवती स्त्रीचे स्वतःचे व बाळाचे आरोग्य नीट राहायला पुढे आयुष्यभर मदत होते. सत्त्वपूर्ण व संतुलित आहार एकंदर आरोग्यासाठी हवाच. गर्भवतीने खाल्लेल्या अन्नापासून तयार झालेला आहाररस हाच गर्भाचे पोषण आणि त्याची वाढ करत असतो. त्यामुळे गर्भवतीने आहाराकडे लक्ष देणे अतिशय आवश्यक असते.
स्त्रिया ह्यापन्नगर्भायास्त्रिधा रसः प्रतिपद्यते स्वशरीरपुष्टये, स्तन्याय, गर्भवृद्धये च । ...चरक शारीरस्थान
अर्थात गर्भवती स्त्रीच्या आहाररसाला तीन जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात. एक स्वतः गर्भवतीच्या शरीराचे पोषण करणे, दुसरी स्तन्याच्या निर्मितीसाठी तयारी करणे आणि तिसरी म्हणजे गर्भाची वृद्धी व पोषण करणे. असे तिहेरी काम व्यवस्थित होण्यासाठी आहाराची योजनाही विचारपूर्वक करावी लागते.
आहारात कोणत्याही प्रकारची कमतरता राहिल्यास त्या आवश्यक पोषकतत्त्वांपासून गर्भ वंचित राहतो. त्याचा परिणाम गर्भाच्या वाढीवर होऊ शकतो. कधी अचानक गर्भपात होऊ शकतो, तर कधी नियत वेळेच्या आधीच बाळंतपण होऊ शकते. जन्मतः बाळाचे वजन कमी असू शकते किंवा अशक्त प्रकृतीचे बाळ जन्मू शकते. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी गर्भवतीने आहाराकडे विशेष लक्ष द्यायला हवे.
गर्भ संस्कार हिंदी बुक
गर्भारपणात आवर्जून सेवन करावेत असे पदार्थ - तापवले असता वर साय येणारे शुद्ध ताजे दूध, दही घुसळून काढलेले लोणी, ताजे गोड ताक, घरी बनविलेले साजूक तूप; भिजवलेले बदाम, काळ्या मनुका, अंजीर, खारीक वगैरे सुका मेवा; ताजी गोड ऋतूनुसार मिळणारी फळे (शहाळे, मोसंबी, द्राक्षे, सफरचंद, डाळिंब, अंजीर, गोड संत्रे यांपैकी एखादे फळ); तांदूळ, गहू, ज्वारी, नाचणी वगैरे धान्ये; मूग, तूर, मटकी, मसूर वगैरे कडधान्ये; दुधी, तोंडली, भेंडी, परवर, पडवळ, दोडके, घोसाळे, टिंडा, कोहळा, गाजर, कारले, लाल भोपळा वगैरे फळभाज्या; पालक, तांदुळजा, चवळई, माठ, मेथी वगैरे पालेभाज्या; कोथिंबीर, कढीपत्ता, ओले खोबरे, कोकम, लिंबू, पुदिना, आले, जिरे, लाल मिरची, तीळ, खसखस, धणे, हळद, मिरी पूड वगैरे मसाल्याचे पदार्थ; साळीच्या लाह्या, मध, केशर, खडीसाखर, योग्य प्रमाणात गूळ
याशिवाय गर्भारपणात रोज सकाळी पंचामृत घेणे उत्तम होय. नावाप्रमाणेच "अमृत‘ असणारे असे "पंचामृत‘ रोज घेतल्यास शरीरशक्ती वाढते, स्फूर्ती वाढते, स्मरणशक्ती वाढते, कांती उजळते, हृदय-मेंदू वगैरे महत्त्वाच्या अवयवांचे पोषण होते व वात-पित्त-कफ या त्रिदोषांचे संतुलन होते. गर्भारपणात सकाळी सकाळी होणाऱ्या उलट्या, उमासे वगैरे तक्रारी कमी व्हायला मदत होते. पंचामृताचे हे सगळे फायदे गर्भवतीला स्वतःला तर मिळतातच; पण गर्भालाही त्याचा उत्तम फायदा होतो. शुद्ध केशर, तसेच सोन्याचा वर्ख, शतावरी यांनी युक्त "संतुलन अमृतशतकरा‘ घातलेले पंचामृत घेतले तर ते अधिक गुणकारी होते.
गर्भाची जसजशी वाढ होत जाते, तसतसे त्याला पोषणही व्यवस्थित व पुरेसे मिळते आहे, याकडे लक्ष ठेवावे लागते. चरकाचार्यांनी याच दृष्टीतून पहिल्या महिन्यापासून नवव्या महिन्यापर्यंत दूध आणि दुधापासून तयार होणारे लोणी, तूप हे पदार्थ विशिष्ट पद्धतीने, काही वेळा विशिष्ट औषधी वनस्पतींबरोबर घ्यायला सांगितले आहेत. प्रत्येक महिन्यात गर्भशरीराचे वेगवेगळे अवयव वा धातू आकाराला येत असतात. त्या दृष्टीने आहाराची रचना केलेली आहे. या गर्भविशेष आहाराचा गर्भाची वाढ परिपूर्ण होण्यासाठी, तसेच गर्भवती स्त्रीचे आरोग्य नीट राहण्यासाठी अप्रतिम फायदा होताना दिसतो.
गर्भ संस्कार हिंदी बुक pdf
पहिल्या
महिन्यात, गर्भधारणा झाली आहे अशी शंका आली, की आधी तापवून घेतलेले
(सामान्य तापमानाचे) दूध थोडे थोडे वारंवार घ्यायला सुरवात करावी.
प्रकृतीला अनुकूल व सोसवेल असे जेवण घ्यावे. दुसऱ्या महिन्यात मधुर रसाच्या म्हणजे शतावरी, गोक्षुर, बला, विदारी वगैरे वनस्पतींनी सिद्ध (या वनस्पतींसोबत पाणी घालून उकळविलेले दूध) घ्यावे. याला सोपा व उत्तम पर्याय म्हणजे शतावरी कल्प घालून दूध पिणे.
तिसऱ्या महिन्यात रोज सकाळी दुधासह तूप व मध मिसळून घ्यावे. साधारण कपभर दुधात दोन चमचे तूप आणि एक चमचा मध घेतलेले चांगले.
चौथ्या महिन्यात रोज सकाळी दुधापासून बनविलेल्या ताज्या घरच्या 10 ग्रॅम (एक मोठा चमचा) लोण्यामध्ये खडीसाखर मिसळून घ्यावे.
पाचव्या महिन्यात वरण, भात, पोळी वगैरेबरोबर सात-आठ चमचे घरचे साजूक तूप आवर्जून खावे.
सहाव्या व सातव्या महिन्यात मधुर औषधांनी सिद्ध तूप अनशापोटी घ्यावे. उदा. शतावरी घृत, यष्टीमधुघृत वगैरे.
आठव्या महिन्यात दररोज कुठली तरी खीर, उदा. रव्याची खीर, तांदळाची खीर, अहळिवाची खीर वगैरे घ्यावी.
नववा महिना सुरू झाला की, योनीच्या ठिकाणी औषधांनी सिद्ध तेलाचा उदा. "संतुलन फेमिसॅन तेला‘चा पिचू, ठेवण्यास सुरुवात करावी व तो बाळंत होईपर्यंत नियमाने ठेवावा.
गर्भसंस्कार पुस्तक pdf
पहिल्या महिन्यापासून ते नवव्या महिन्यापर्यंत
सुचविलेली ही आहारद्रव्ये व उपचारांचा फायदा गर्भवतीला स्वतःचे आरोग्य
टिकविण्यास तर होतोच, बरोबरीने तिचे बाळही निरोगी, उत्तम कांती व ताकद
असलेले, तसेच छान आवाज असलेले व उत्कृष्ट शरीरबांधा असलेले होण्यास मदत
मिळते. गर्भधारणेचे नऊ महिने सहज पार पडतात आणि प्रसूती सहसा समस्या
उत्पन्न न होता सहज होते.
बालाजी तांबे गर्भसंस्कार पुस्तक मराठी
गर्भारपणाच्या नऊ महिन्यांच्या काळात
स्वतः स्त्री आणि तिच्या आत आकार घेणारा गर्भ, दोघेही अतिशय कोमल, नाजूक
स्थितीत असतात. गर्भवती स्त्रीला जपून राहावे, वागावे लागते ते यासाठीच.
पुस्तक में गर्भस्थ शिशु की ट्रेनिंग, जन्म पूर्व बेबी कम्युनिकेशन के बारे में बात की गई है, तो भ्रूण की विशेष ..