Showing posts with label पॉलिसिस्टिक ओव्हरीज. Show all posts
Showing posts with label पॉलिसिस्टिक ओव्हरीज. Show all posts

Thursday, January 7, 2016

मासिक पाळीतील समस्या पॉलिसिस्टिक ओव्हरीज

अनियमित मासिक पाळी: का कुणास ठाऊक परंतु त्यांच्या संपूर्ण आयुष्यात काही स्त्रियांना मासिक पाळी नियमितपणे येत नाही. ... खूप कमी वजन असणे – पाळी येण्यासाठी तुमच्या शरीराच्या वजनात चरबीचे प्रमाण कमीतकमी १५% असले पाहिजे. कुपोषण 
गेल्या काही वर्षांत पॉलिसिस्टिक ओव्हरीजची समस्या घेऊन येणाऱ्या मुली आणि स्त्रियांच्या
संख्येत खूपच वाढ झाली आहे . स्त्रीरोगतज्ज्ञ आणि इतर शाखांचे डॉक्टरही यावर गांभीर्याने
विचार करायला लागले आहेत .

सोनोग्राफीमध्ये स्त्रीबीजकोशात ( ओव्हरीज ) विशिष्ट तऱ्हेने माळेसारख्या फॉलिकल्स (
पिटिका ) आढळतात . त्याला पॉलिसिस्टिक ओव्हरीज म्हणतात . प्रत्येक महिन्याला तीन ते
चार फॉलिकल्स तयार होतात . त्यातील एक फॉलिकल फुटून त्यातून स्त्रीबीज गर्भाशयात येते
व इतर फॉलिकल्स नैसर्गिकरित्या विरघळून जातात . मात्र हार्मोन्सच्या असंतुलनामुळे
फॉलिकल्स न फुटता तशीच स्त्रीबीजकोशात साठत जातात व माळेसारखा आकार तयार होतो .
पॉलिसिस्टिक ओव्हरीजमुळे वंध्यत्वाची समस्या येऊ शकते . त्याशिवाय , पाळी अनियमित येणे ,
अधिक रक्तस्राव होणे अशा समस्याही दिसतात .

ज्या मुलींना मासिक पाळी अधिक कालावधीने ( उदा . दीड ते तीन महिन्यांनी ) येते ,
त्यांच्यापैकी अर्ध्याहून अधिक मुलींना पॉलिसिस्टिक ओव्हरीजची समस्या असल्याचे आढळून येतात
. अनियमित पाळी येत असलेल्या २८ टक्के मुलींमध्ये ही समस्या दिसते . मात्र सगळ्याच मुलींना
उपचारांची आवश्यकता नसते . वयानुसार ही समस्या आपोआप कमी होते . मात्र तरीही
काहींमध्ये कमी - अधिक प्रमाणात ही समस्या आढळून येते . हल्ली मुली मासिके , इंटरनेटवरून
पॉलिसिस्टिकविषयी योग्य / अयोग्य माहिती मिळवून खूप काळजीत पडतात . मुलीला
लग्नानंतर काही समस्या होतील का , कॅन्सर होईल का , अशा शंका घेऊन आईसह मुली येतात .

लक्षणे : पाळी उशिरा ( दीड ते तीन महिन्यांनी ) येणे , वजन वाढणे , चेहऱ्यावर मुरुमे येणे
, चेहऱ्यावर तसेच शरीरावर इतरत्रही लवेचे प्रमाण वाढणे , काही वेळा पाळी बंद होणे किंवा
अतिरिक्त स्राव सुरू होणे .
कारणे : पॉलिसिस्टिकमागील कारणांबाबत एकवाक्यता नाही . अंतस्रावांमध्ये असंतुलन ,
शरीरातील पेशींमध्ये इन्शुलीनप्रति असहकार , पुरुषी अंतस्राव ( अँड्रोजन ) अधिक प्रमाणात
स्रवणे , अनुवंशिकता , कुटुंबात मधुमेह यांपैकी एखाद्या कारणामुळे पॉलिसिस्टिकची समस्या
निर्माण होते .

शरीरातील चयापचयाच्या क्रियांमध्ये होणाऱ्या बदलांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे ,
अतिरक्तदाब , स्थूलता , रक्तातील कोलेस्टेरॉल , ट्रायग्लिसरॉइड््सचे प्रमाण वाढणे अशा अनेक
समस्या निर्माण होतात . पॉलिसिस्टिक ओव्हरीज ही या बदलांपैकीच एक . गुणसूत्रांमधील
फेरफार , बाह्य वातावरणाचा परिणाम , चिंता , ताणतणाव , खाण्यापिण्याच्या चुकीच्या
सवयी , स्पर्धात्मक जगातील दबाव , प्रदूषण अशा अनेक बाबींमुळेही पॉलिसिस्टिकची समस्या
होऊ शकते .

उपाय : मासिक पाळी नियमित करण्यासाठी विशिष्ट औषधे दिली जातात . विशेषत :
प्रोजेस्टेरॉनच्या गोळ्यांचा विशिष्ट कोर्स दिला जातो . काही वेळा गर्भनिरोधक
गोळ्यांचाही वापर केला जातो . या गोळ्यांमुळे FSH, IH हे अंतस्राव कमी होतात .
स्त्रीबीजकोषांचे कार्य काही काळ थांबून त्यांना विश्रांती मिळते . डिसोजेस्ट्रेल किंवा
सिप्रोटेरॉन अॅसिटेट असलेल्या गर्भनिरोधक गोळ्यांमुळे मुरुमे , लव यांचे प्रमाण कमी होते .
विवाहानंतर लवकर गर्भधारणा हवी असल्यास स्त्रीबीज गर्भाशयात येण्यासाठी मदत करणारी
औषधे दिली जातात . वजन जास्त असल्यास तसेच इन्शुलिन रेझिस्टन्स असल्यास मेटफॉर्मिन या
मधुमेहनिवारक गोळ्याही दिल्या जातात . औषधांसोबतच वजन कमी करणे , नियमित व्यायाम
करणे , ताणतणाव कमी करणे , समुपदेशन घेणे , मुरुमे - लव यावर उपचार करणे अशा अनेक
बाबींचा विचार केला जातो .


पॉलिसिस्टिक ओव्हरीज