Thursday, January 16, 2020

white hair problem केस पांढरे न होण्यासाठी उपाय , पांढरे केस काळे करणे यावर उपाय

केस अकाली पांढरे का होतात?

अचानक केस गळणे

आज अनेकांचे खूप कमी वयातच केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. केस पांढरे होण्याचे हे प्रमाण अचानक का वाढले या बाबत अनेक कारणे आहेत. ही कारणं आहेत ज्यामुळे केस पांढरे होतात.
केस पांढरे होण्यामागची ५ कारणे :


१. व्यसन : 

व्यसन हे तसं तर अनेक आजारांना कारणीभूत असतं. याचा आरोग्यावर खूप मोठा परिणाम होतो. पण केस पांढरे होण्यामागचं हे ही मोठं कारण आहे. 


२. आजार : 

अनेक दिवसांपासून आजारी असल्यास केस पांढरे होण्याची शक्यता असते. कारण या वेळेत आपण मोठ्या प्रमाणात औषधाचे सेवन करतो. त्याचा परिणाम केसांच्या रंगावर होतो.

३. मेलानिन

आपल्या शरिरात मेलानिन हा रंगद्रव्य असतो जो केसाचा रंग काळा ठेवण्यास महत्त्वाची भूमिका बजावतो. शरिरात जेव्हा मेलानिन कोशिकांची निर्मिती होणे बंद होते तेव्हा केसाचा रंग बदलतो. त्यामुळे कमी वयातही केस पांढरे होतात.


४. आहार : 

आहार हा शरिरातील प्रत्य़ेक गोष्टीमध्य् महत्त्वाची भूमिका बजावत असतो. आपण कशा प्रकारचा आहार घेतो यावर आपलं आरोग्य अवलंबून असतं. आहारात जीवनसत्व-बी, प्रथिने, कॉपर आणि आयोडीन यासारख्या घटकांच्या कमतरतेमुळेही केस पांढरे होतात. 


५. अस्वच्छता

काळे केस अर्थ 

केसाची निगा न राखणे हे देखील केस पांढरे होण्यामागचं मोठं कारण आहे. प्रदुषण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे केसांची निगा राखणं गरजेचं झालं आहे. 

या शिवाय ताण-तणाव, शरिरात कॉपरची कमतरता, अनुवंशिक दे देखील केस लवकर पांढरे होण्यामागची कारणे आहेत.
Image result for white hair problem

अकाली पांढरे होणारे केस

 हा  चिंतेचा विषय असून यामागे अनेक करणे असतात. केसांना तेल न लावणे हलक्या किंमतीचा साबण व शॅम्पूचा अधिक वापर करणे, सतत औषधे घेणे, डोकेदुखी, सर्दी-पडसे, बद्धकोष्ठता, मानसिक तणाव, अशक्तपणा, केसांत कोंडा होणे, निद्रानाश, आनुवंशिकता इ. कारणांमुळे केस अकाली पांढरे होतात. शरीरातील व्हिटॅमिनची कमतरता असल्यानेही केस अकाली पांढरे होतात. काही लोक आढळले आहे की ज्यांचे केस हिवाळ्यामध्ये पांढरे होतात व उन्हाळ्यामध्ये पुन्हा काळे होतात. मात्र, यामागचे खरे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
केस अकाली पांढरे होण्याच्या समस्येपासून वाचण्यासाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक असते. त्याकरीता नियमित दिनचर्या, उचित वेळी केस धुणे, संतुलित आहार, व्यायाम, उत्तम झोप यांची आवश्यकता असते. केस काळे राखण्यासाठी शरीराला प्रोटिन व्हिटॅमिन ए. बी. सी. डी. ई. कॅल्शिअम आयोडीन, फॉस्फोरस, खनिज क्षार, कार्बोहायड्रेट, आयर्न, कॉपर इ. पदार्थ पर्याप्त प्रमाणात मिळाले पाहिजेत. व्हिटॅमिन व कॉम्लेक्समध्ये आढळणारे पॅन्टोर्थेनिक ऍसिड फॉलिक ऍसिड इ. पदार्थ केस काळे राखण्यात महत्वाची भुमिका बजावतात.त्यामुळे, शरीराला सर्व द्रव्य योग्य प्रमाणात मिळण्याकरिता आहारात दूध, दही, लोणी, पनीर, अंडे, गाजर, मुळा, टोमॅटो, मटार, पालक, लिंबू, आवळा, खजूर, द्राक्षे, सफरचंद, मोसंबी, पालेभाज्या, ताजी फळे, अंकुरीत धान्ये आदिंचा समावेश करावा.

कमी वयात केस पांढरे होणे 

म्हणजे चिर तारुण्यात म्हातारपण आल्यासारखे वाटते. धकाधकीच्या जीवनात केसांची काळजी घेणे आपल्याला शक्य नसते. तर बहुतेकांना कामाचा ताण आणि प्रदूषणामुळे अकाली पांढर्‍या केसांचा सामना करावा लागतो. केस काळे करणे अथवा कलर करणे हा यावर एकमात्र उपाय नाही. काही घरगुती उपचार करून पांढरे केस पुन्हा काळे करू शकतात.


अर्धा कप दहीमध्ये चिमुटभर काली मिर्च आणि चमचाभर लिंबूचा रस मिसळून केसांवर लावावे.

दररोज साजुक तुपाने डोक्याची मालिश केल्याने पांढरे केस काळे होण्यास मदत होते.

आवळा पावडरमध्ये लिंबूचा रस घालून तयार झालेली पेस्ट केसांवर लावल्याने पांढरे केस काळे होतात.
दररोज केसांवर कांद्यांची पेस्ट लावल्याने पांढरे केस काळे हो़ऊ लागतील.

तीळ खावी तसेच तीळ तेल केसांवर लावावे.

कच्च्या पपईचा पेस्ट डोक्याला दहा मिनिटांपर्यंत लावून ठेवल्याने केस गळत नाहीत आणि कोंडाही होत नाही.

दूध अथवा दहीत बेसन घालून केसांवर लावल्याने लाभ होतो.

अकाली केस पांढरे होण्यासंदर्भातील महत्त्वाच्या गोष्टी :


एक-दोन केस पांढरे झाले असल्यास ते केस तोडू नका. असे केल्याने केस पांढरे होऊ लागता.
थोडे केस पांढरे झाले असल्यास डाय करू नका. त्यामुळे काळ्या केसावरही प्रभाव पडतो. केस आणखी वेगाने पांढरे होऊ लागतात.
केस धुण्यासाठी साबण व शॅम्पू ऐवजी आवळा, रिठे, शिकेकाई, बेसन, दही इ. चा वापर करा. खूप गोड पदार्थ, तेलकट, मसालेदार भोजन, दारु, अमली पदार्थ यांचे सेवन करु नका.
केस धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा.
केसांमध्ये हेयर स्प्रे व केस वाळविण्यासाठी हेयर ड्रायरचा वापर कमीत कमी प्रमाणात करावा.
केसांकरिता मेहंदीच्या वापराचे अनेक फायदे आहेत. मुख्यत्वेकरून मेहंदी जरी केस रंगवण्यासाठी वापरली जात असली तरी अशीच नियमित लावण्याने केसांचे आरोग्य सुधारते. केसांवर एक छान चकाकी येऊन केस सुटे सुटे होऊन खुलतात. ज्याला कंडिशनर असे म्हणले जाते. केस अकाली पांढरे होत नाहीत. डोक्याला कोंडा होण्याचा थांबतो व केसांची वाढ होते. तुरळक पांढरे झालेल्या केसांना मेंदी लावून झाकता येते. रासयनिक डायमधील द्रव्यांचा दुष्परिणाम होऊ नये म्हणून १५ दिवसांतून एकदा मेहंदी लावावी.


पांढरे केस काळे करण्यासाठी काही घरगुती उपचार-
केस कायमचे काळे करण्यासाठी उपाय 



1. ब्लॅक कॉफी

Black coffee
 ब्लॅक कॉफी  Black coffee
ब्लॅक कॉफीेने बिना काही साईड इफेक्ट आपण पांढऱ्या केसांपासून सुटका मिळवू शकतो. त्यासाठी तुम्हाला ब्लॅक कॉफी पूर्ण केसांना अर्धा तासासाठी लावून ठेवायची आहे. यानंतर शाम्पू न लावता केसांना धुवून काढायचं आहे. काही हप्त्यासाठी तुम्ही हे केलं तर तुमचे केस नैसर्गिकरित्या पांढरे होतील.

2. आवळा

केस काळे करण्यासाठी उपाय सांगा, केस काळे करण्यासाठी मेहंदी ,केस गळतीवर आयुर्वेदिक तेल

Amala

पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी आवळा हा फार पूर्वीपासून वापरला जात आहे. पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी सर्वप्रथम आवळा पाण्यात चांगल्या प्रकारे उकळून घ्या उकळल्यानंतर त्याचे पेस्ट बनवून ते कमीत कमी अर्धा तास केसांच्या मुळाला लावुन ठेवा. ही पद्धत तुम्ही महिन्यामधध्ये 4 वेळा तरी अवलंबली पाहिजे. यानंतर थोड्याच दिवसात तुम्हाला फरक जाणवू लागेल आणि केस नैसर्गिकरित्या काळे आणि अजून आकर्षक दिसायला लागतील.

3. ओट्स

Oats

ओट्स चा उपयोग आपण आपण खाण्यासाठी करतो, परंतु त्यामध्ये बायोटिन तत्व असतात जे की आपल्या केसांना पांढरे ठेवण्यासाठी मदत करतात आणि एवढेच नाही तर तुमचा डँड्रफ सुद्धा कमी होऊ शकतो. ओट्स ने पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी ओट्स ला तुम्ही उकळून केसांवर लावले तर काही आठवड्यात तुम्हाला तुमचे केस काळे झालेले दिसतील.

4. चहाचे पानं

Tea Leaves

चहाच्या पानांनी पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी पाने चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये उकळून घ्या आणि त्या पाण्याने केसांना धुवा. चहाच्या पानांनी केसं काळे होण्यास वेळ लागू शकतो पण हे पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि आपल्या एक एक केसाला काळे करण्यास मदत होते. यामुळे केसांमध्ये पूर्णपणे नैसर्गिक चमक तयार होते आणि तुमचे केस खूप आकर्षक वाटू लागतात.

5. मेहंदी

Mehendi

हप्त्यामध्ये एकवेळ केसांना मेहेंदी लावल्याने तुमचे जवळपास 2 महिन्यात तुमचे केस तुम्हाला काळे झालेले दिसू लागतील. आणि यापेक्षाही चांगले म्हणजे तुम्ही केसांना काळे करण्यासाठी त्रिफळा, शिकेकाई, आवळा आणि ब्लॅक कॉफीचा उपयोग करू शकता. यामूळे मेहेंदीची इलाज करण्याची क्षमता दुप्पट होते. आणि यांचे मिश्रण लावल्याने केस खूप मऊ होतील.

 केसांचा रंग

 आपल्या केसांचा रंग हा केसातील रंगकाणांवर म्हणजे मेलेनिन मुळे ठरतो. ज्या रंगाचे मेलेनिन त्याच रंगाचे केस असतात म्हणजे मेलेनिन काळे तर केस ही काळे आणि मेलेनिन जर तांबुस असतील तर केसही तांबुस असतात. ब्लाँड , ग्रे, ब्राउन या नैसर्गिक छटांच्या मेलेनिनची रचना वेगळी असते. जेव्हा या नैसर्गिक मेलेनिन चे प्रमाण अत्यंत कमी होते तेव्हा केस पांढरे होतात. 

शरीरात होणारे हार्मोनियल बदल, रक्तातील प्राणवायु, शरीरात असणारे लोह, तांबे, इतर जीवन सत्वे , क्षार यांची कमतरता अशा काही मुख्य कारणांमु़ळे केसांचा रंग बदलुन पांढरा होतो आणि एकदा का केसांचा रंग पांढरा झाला की तो नैसर्गिक रीत्या बदलत नाही. असे अकाली पांढरे झालेले केस बहुतकरुन कुणाला आवडत नाहीत.आजकाल हेअरकलर म्हणजे फक्त पांढरे केस काळे करणे 

इतकच नव्हे तर फॅशनचा एक अविभाज्य भाग बनुन गेले आहे. काळा , चॉकलेटी , मरुन , बरगंडी, पिंगट अशा वेगवेगळ्या छटा याला आजकाल सगळीकडे पसंती आहे. त्यात चाळीशी आली की डोक्यावर रुळणारे रुपेरी केस आपल्याला आपल्या वार्धक्याची जाणीव करुन देतात. सण-समारंभ , लग्न , मंगल कार्य यात सगळेजण आपल्या रुपेरी केसांवर एक मुलामा देउन वावरत असतात. 

आजकाल केस रंगवण्याचे बरेच प्रकार बाजारात उपलव्ब्ध आहेत पण पुर्वी मेंदी आणि तत्सम नैसर्गिक वस्तुंचा केस रंगवण्यासाठी वापर केला जात असे. चला तर पाहुया केस रंगवण्याचे आधुनिक प्रकार आणि छटा. आपल्या भारतात केसांच्या रंगांबद्दल जास्त जागरुकता दिसुन येत नाही. बर्‍याचदा डोळ्यांंची जी छटा असते त्या छटेचे केस त्या व्यक्ति ला शोभुन दिसतात पण आपल्याकडे काळा, चॉकलेटी हे रंग जास्त प्रमाणात वापरले जातात.

कलप किंवा डाय करण्याचे प्रकार -


मेंदी - मेंदी हे नैसर्गिक कलप आहे. त्याबरोबर ते कंडीश्नर हि आहे.इजिप्शियन राणी "सेसा" हिने मेंदीचा वापर केल्याचे माहीत आहेच. पुर्वापारापासुन आपल्याकडे मेंदी चा वापर केस रंगवण्यासाठी केला जातो.यामधे रंग निर्माण करणारे लॉसन असते. मेंदी चा इतर केमिकल डाय प्रमाणे कुठलाही दुष्परीणाम नसतो काळ्या हेअर डाय ने केस खुपच काळेभोर झाले तर मेंदी लावुन तो कलर जरा कमी करु शकतो. मेंदी मुळे केसांना नैसर्गिक चमक येते. 
पण जर केस खुपच पांढरे असतील तर मेंदी मुळे केसांना शेंदरी पिवळट छटा येते जी अज्जिब्बात चांगली दिसत नाही. मुळचे केस काळे असतील आणि बरेचसे पांढरे झाले असतील तर मेहेंदी मुळे पांढरे केस लालसर आणि काळे केस भुरकट दिसतात असा कलर चेहर्‍याला शोभुन दिसतो. मेंदी लावण्याआधी केसांना तेल लावले असेल तर केस धुवुन घ्यावेत. साधारण लोखंडाच्या भांड्यात किंवा कढईत मेंदी २-३ तास चहा किंवा कॉफी उकळुन त्यात भिजत घालावी. 

मेंदी हे नैसर्गिक कलर कलप असल्याने रंग ये ण्यासाठी दुसरे काही घालण्याची गरज नाही पण केसांसाठी पोषक असे आवळा पावडर , नागर मोथा ,वाळा याचा वापर करु शकता. त्या नंतर केसाला मेदी लावुन २ तासाने धुवुन टाकावी. मेंदी केसाला लावायची पद्धत पुढच्या भागात देतेच आहे.
मेंदीमधे दुसरा मिसळला जाणारा वनस्पति जन्य रंगप्रकार म्हणजे "नीळ". या पानांची भुकटी जर मेंदीत मिसळली तर निळसर पासुन गडद काळ्यापर्यंत कोणत्याही रंगछटा केसांवर चढवता येतात. परंतु आजकाल याचा वापर कमी होतो. या शिवाय, कॅमोमिल, ब्राझिल वुड , अक्रोडाची हिरवी वाले याचा उपयोग करुन केसांसाठी निरनिराळे रंग बनवता येतात.

केमिकल डाय :— 

अलिकडे केमिकल डायने केस रंगविण्याचे प्रमाण वाढले आहे. यात गोदरेज हेअर डाय, गार्नियर, लॉरीयल , वेला , नुपुर मेंदीडाय अशा बर्‍याच नावाजलेल्या कंपन्यांची चलती आहे, स्वस्त आणि मस्त या वा क्याला अनुसरुन गोदरेज हेअरडाय च्या डाईला सगळ्यात जास्त मागणी आहे. पण जितके स्वस्त कलप तितके त्याचे दुष्परीणामही जास्त. 
हलक्या दर्जाच्या डाईने केस जास्त पांढरे होतात मग याचा वापर सतत करावा लागतो. केस गळणे अ‍ॅलर्जी , कोंड्याचे प्रमाण वाढणे हे प्रकार वाढतात. त्यातल्या त्यात वेला , लॉरीयल आणि नावाजलेल्या कंपन्यांची उत्पादने वापरणे बरे. पण तरीही केमिकल डाय वापरणे अपायकारकच. केमिकल डाय मधे आजकाल मेंदी डाय हा प्रकार हि खुप वापरला जातो. 
त्यातल्या त्यात मेंदी म्हंटल म्हणजे हर्बल आणि म्हणुन ते सेफ असणार असे बर्‍याच जणांचे मत असते पण हे साफ चुकीचे आहे. कारण यात काळा , बरगंडी या छटा असतात आणि त्या केमिकल डाय असल्याशिवाय मिळु शकत नाही. दुसरा प्रकार म्हणजे शाम्पु बेस डाय. उदा. वॅसमॉल केश काला. या प्रकारात डाय हा शॅम्पु प्रकारात असतो. केसांवर काही वेळ ठेवुन धुवुन टाकल्यावर हवा तो कलर केसांना येतो.
पर्मनंट हेअर डाय हा प्रकार हि फॅशन जगतात खुप फेमस आहे. यात हेअर कलर केसांना पर्मनंट लागतो पण आपल्या केसांची सतात वाढ होत असते , जस जसे केसांची वाढ होते नवीन आलेल केस हे नैसर्गिक रंगाचेच येतात त्यामूळे आपल्याला नवीन केसांना डाय करावेच लागते. 
आपल्या चेहफ्याच्या कलर ला सुट होईल असे कलर वापरणे योग्य ठरते. जसे गोर्‍यापान वर्ण असलेल्या करड्या रंगांचे डोळे असणार्‍या व्यक्तिंना ग्रे कलरचा हेअरकलर जास्त सुट होतो . तसेच चॉकलेटी यात डार्क , मिडीयम , लाईट हे शेड , बरगंडी या शेडस ही खुप सुट होतात. सावळया वर्णाच्या व्यक्तिंना चॉकलेटी यात डार्क , मिडीयम , लाईट हे शेड ही सुट होतात. बर्‍याच दा केसांचे थोडे थोडे भाग घेउन ब्लाँड , बरगंडी , पिंक अशा शेडसने रंगवले जातात.

Fast Hair Growth Tips In Marathi  | Gharguti Upay For Hair In Marathi | Kale Kes In Marathi | Kes Dat Honyasathi Gharguti Upay | Kes Galne Thabne  | Kes Galne Thabne  | Kes Galti Gharguti Upay  | Kes Galti Gharguti Upay  | Kes Galti Oil  | Kes Galti Sathi Gharguti Upay  | Kes Galti Upay Swagat Todkar  | Kes Galti Var Gharguti Upay | Kes Galti Var Upay In Marathi | Kes Galti Var Upay Swagat Todkar  | Kes Jad Honyasathi Upay | Kes Kale Karnyache Gharguti Upay  | Kes Kale Karnyache Upay | Kes Kale Karnyache Upay In Marathi  | Kes Lamb Honyasathi Gharguti Upay | Kes Lamb Honyasathi Upay  | Kes Pandhare Hone  | Kes Pandhare Honyachi Karane  | Kes Pandhare Honyachi Karane  | Kes Pandhare Honyachi Karane  | Kes Saral Karnyache Upay  | Kes Vadhavnyache Upay | Kes Vadhisathi Upay In Marathi  | Kesavar Upay  | Pandhare Kes | Pandhare Kes Kale  | Pandhare Kes Kale | Pandhare Kes Kale Honyasathi Upay  | Pandhare Kes Kale Karane  | Pandhare Kes Kale Karne | Pandhare Kes Kale Karne In Marathi | Pandhare Kes Kale Karnyasathi Upay | Pandhare Kes Upay | Pandhare Kes Upay In Marathi | Silky Hair Tips In Marathi  | Swagat Todkar Kes Kale Karne | केस गळतीवर घरगुती उपाय  | केस गळतीवर घरगुती उपाय कांदा  | केस गळतीवर घरगुती उपाय मेथी  | केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय  | केस नैसर्गिकरीत्या काळे करण्याचे घरगुती उपाय  | केस पांढरे उपाय  | केस पांढरे का होतात  | केस पांढरे न होण्यासाठी उपाय  | केस पांढरे होण्याची कारणे  | केस पांढरे होण्याची कारणे व उपाय  | केस वाढ उपाय  | केस वाढीसाठी उपाय सांगा  | केसांना मेहंदी कशी लावतात  | केसांना मेहंदी किती वेळ ठेवावी  | डोक्याचे केस पांढरे का होतात  | दाढीचे केस पांढरे उपाय  | दाढीचे केस पांढरे होण्याची कारणे  | दाढीचे पांढरे केस काळे करण्यासाठी उपाय  | पांढरे केस काळे करणे यावर उपाय  | पांढरे केस काळे कसे करायचे  | पांढरे केस काळे होण्यासाठी उपाय  | लहान मुलांचे केस पांढरे होणे   |  

No comments:

Post a Comment