बेडरूम फक्त झोपण्यासाठी
* मास्टर बेडरूम दक्षिणेला असावी. नैऋत्येतही चालते.
* मोठय़ा मुलाची बेडरूम आग्नेयेला किंवा पश्चिमेला चालते.
* वायव्येचं बेडरूम गेस्ट रूम म्हणून किंवा मुलीचे बेडरूम म्हणून वापरावं
* पाहुण्यांसाठी पश्चिमेची बेडरूम चालते.
* ईशान्येचं बेडरूम शालेय वयातील मुलांसाठी वापरावं. या बेडरूममध्ये अभ्यास शांतचित्तानं होतो.
* घरात वृद्ध आईवडील असतील आणि त्यांची तब्येत ठीक नसेल तर त्यांना ईशान्येची बेडरूम द्यावी.
* नवदाम्पत्यानं ईशान्येची बेडरूम वापरू नये असं म्हणतात, पण त्याला ग्रंथाधार नाही.
* पश्चिम व उत्तरेला डोकं करून झोपू नये.
* बीमखाली झोपू नये.
* टॉयलेटच्या भिंतीला डोकं लावून झोपू नये.
* घराचा मुख्य दरवाजा, गॅसची शेगडी, तिजोरी, देव्हारा यांच्याकडे पाय करून झोपू नये.
* वरच्या मजल्याच्या टॉयलेटच्या खाली आणि खालच्या मजल्याच्या गॅस शेगडीच्या वर झोपू नये.
* धान्याचा साठा, गायीचा गोठा, देऊळ, गुरूंचं निवास, अग्नी यांच्या वर झोपू नये.
* ओल्या पायांनी झोपू नये.
* लक्ष्मी प्राप्तीची इच्छा धरणाऱ्यांनी नग्नावस्थेत झोपू नये.
* शक्य होतील तितकी विजेवर चालणारी उपकरणं बेडरूममधून हटवावीत. टीव्ही, डेक, स्पीकर्स, कॉम्प्युटर, साईड लॅम्प, आन्सरिंग मशिन, कॉर्डलेस टेलिफोन बेडरूममध्ये ठेवू नयेत. अगदीच इलाज नसेल तर तुमच्या बेडपासून किमान सहा फूट अंतरावर ती राहतील याची काळजी घ्यावी. रात्री झोपताना ही उपकरणं अनप्लग करावीत. फक्त स्वीच ऑफ करून भागणार नाही.
* पलंग लाकडाचे वापरावेत, धातूचे नकोत.
* बेडरूममधील लोखंडी कपाटं, टाईपरायटर, लोखंडी रॅक कमी करता आल्या तर बरं. मोटर गॅरेज किंवा लोखंडी सामानाच्या दुकानाच्या वर आपली बेडरूम असू नये असं बाऊ बायोलॉजी हे जर्मन शास्त्रं सांगतं.
* पाण्याचा बेड वापरू नये. इलेक्ट्रिक ब्लँकेट नको.
* पलंगाच्या खालून इलेक्ट्रिक वायर जाणार नाहीत याची खात्री करावी.
* सिन्थेटिक कार्पेट, सिन्थेटिक वॉलपेपर, सिन्थेटिक उशा बेडरूममध्ये नकोत. प्लास्टिकच्या जितक्या वस्तू बेडरूममधून हटवता येतील तितक्या हटवाव्यात.
* घराच्या वीजप्रवाहाचं अर्थिग व्यवस्थित आहे याची अधूनमधून इलेक्ट्रिशियनकडून तपासणी करावी. प्रगत देशांमध्ये डीमांड स्वीच किंवा कट ऑफ स्वीच नावाचं उपकरण मिळतं. शिवाय इलेक्ट्रोमॅग्नेटिक पेन्टही मिळतात. यांचा वापर केल्यास इलेक्ट्रोमॅग्नेटि रेडिएशनपासून बचाव होऊ शकतो.
* रेडिओअॅक्टिव्ह स्मोक डिटेक्टर बेडरूममध्ये बसवू नये.
* रात्री खिडक्या उघडय़ा ठेवाव्यात. रात्री एसी लावून झोपण्याची सवय असणाऱ्यांनी संपूर्ण दिवसभर खिडक्या उघडय़ा ठेवाव्यात. दिवस-रात्र खोली बंद ठेवणं चांगलं नाही. तिला मोकळा श्वास घेऊ द्या. बाहेरच्या वातावरणाशी, कॉस्मिक एनर्जीशी तिचं स्पंदन होऊ द्या.
* बेडरूमच्या भिंतीला लागून बाहेरच्या बाजूनं विजेची उपकरणं असतील तर त्या भिंतीला खेटून पलंग ठेवणं टाळावं. बेडरूमची एखादी भिंत शेजारच्या फ्लॅटला कॉमन असेल तर अशा भिंतीला खेटून पलंग ठेवणं टाळावं. कारण त्या बाजूला शेजाऱ्यानं कोणती उपकरणं ठेवली असतील ते आपल्याला माहीत नसतं. शिवाय त्या भिंतीत त्यानं इलेक्ट्रिक वायर कन्सिल्ड केलेली असू शकते.
* नैऋत्येच्या बेडरूमला शक्यतो अर्थ शेड वापराव्यात. (क्रीम, ब्राऊन, यलो वगैरे) गुलाबी रंगही चालू शकेल.
* पांढरा, हिरवा रंग शक्यतो टाळावा. निळा किंवा निळ्याची कोणतीही शेड नकोच.
* रंग वापरायचे असतील तर पूर्व व उत्तर भिंतीवर हलक्या शेड वापराव्यात आणि पश्चिम व दक्षिण भिंतीवर गडद शेड वापराव्यात. या भिंतीवर टेक्श्चर पेन्ट वापरायलाही हरकत नाही.
* बेडरूमच्या खिडक्यांसाठी पडदे गडद रंगाचे आणि जाड कापडाचे वापरावेत. त्यावर अॅबस्ट्रॅक्ट डिझाईन असावी. फुलाफुलांचे- वेलबुट्टीचे पडदे नकोत.
* फ्लोरिंगसाठी व्हिट्रीफाईड, सिरॅमिक टाईल वापराव्यात. टाईलचा रंग अर्थ शेडमध्येच असावा.
* नैऋत्येच्या बेडरूममध्ये पांढरा मार्बल वापरू नये. पिवळ्या जैसलमेरचा वापर फ्लोरिंगसाठी किंवा स्कर्टिगसाठी किंवा विन्डो फ्रेमसाठी करता आला तर सोन्याहून पिवळं.
* ज्यांचा स्वत:चा व्यवसाय आहे अशा जातकांनी येथे वूडन फ्लोरिंग वापरू नये.
* ग्रेनाईटचा वापर पूर्णत: टाळावा.
* बेडरूममध्ये पलंग योग्य प्रकारे ठेवता येईल याला प्राधान्य द्यावं. झोपतानाची दिशा दक्षिणेकडे राहील अशा प्रकारे तो ठेवावा. ते शक्य नसेल पूर्वेला डोकं राहील अशाप्रकारे तो ठेवावा.
* पलंगाला सॉलिड हेडपोस्ट असावा.
* शक्यतो पलंगाला बॉक्स नसावा. अगदीच स्टोरेजचा प्रॉब्लेम असेल तर बॉक्सबेड वापरायला हरकत नाही. पण त्यात फक्त चादरी, अंथरूण वगैरे स्टोअर कराव्यात, रद्दी, पुस्तकं, अडगळीच्या वस्तू बेडखाली स्टोअर करू नयेत.
* बेडखाली धान्याचा साठा किंवा छुपी तिजोरी ठेवू नये.
* बिछाना अखंड असावा. दोन बिछाने ठेवू नयेत.
* शक्यतो कापसाचा बिछाना वापरावा. स्पंज आणि स्प्रिंगचा वापर केलेले बिछाने वापरू नयेत.
* बेडरूममध्ये वर्किंग टेबल ठेवणार असाल तर ते पूर्व किंवा उत्तर भिंतीला लागून ठेवावे. म्हणजे तेथे बसणाऱ्याचं तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेला येईल.
* वॉर्डरोब पश्चिम किंवा दक्षिण भिंतीला लावावेत.
* ड्रेसिंग टेबल अशाप्रकारे ठेवावं की झोपलेल्या माणसाची प्रतिमा आरशात पडणार नाही.
* हेडपोस्टमध्ये आरसा लावू नये.
* बेडरूममधील चित्रांची निवड काळजीपूर्वक करावी. उदासवाणी चित्रं लावू नयेत. ज्यातून एकटेपण प्रतीत होतं अशी चित्रं लावू नयेत.
* पती- पत्नींचा एकत्रित फोटो जरूर लावावा.
* मॅन्डरिन डक, लव्ह बर्ड ठेवावेत. पण जोडीनं. नैर्ऋत्य प्रभाग हा तमोगुणांचा आहे, तर देव सत्त्व गुणांचे. त्यामुळे नैर्ऋत्येतील बेडरूममध्ये शक्यतो देव्हारा नको.
* मूल हवं असलेल्या नवदाम्पत्यानं मात्र बाळ श्रीकृष्णाचं मोठं चित्र बेडरूममध्ये जरूर लावावं.
* नैऋत्येच्या बेडरूममध्ये धबधब्याची चित्रं, जिवंत फुलं किंवा शोभेची झाडं ठेवू नयेत. खिडकी किंवा बाल्कनी असेल तर तेथे पिवळ्या कुंडीत तुळस लावायला हरकत नाही.---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog