Showing posts with label "यूएन'च्या आमसभेत सुप्रिया सुळे यांचे भाषण. Show all posts
Showing posts with label "यूएन'च्या आमसभेत सुप्रिया सुळे यांचे भाषण. Show all posts

Wednesday, January 6, 2016

"यूएन'च्या आमसभेत सुप्रिया सुळे यांचे भाषण

पुणे - बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संयुक्त राष्ट्रसंघात (यूएन) भारताची अन्नसुरक्षाविषयक भूमिका आज मांडली. खासदार सुळे यांच्या नेतृत्वाखालील खासदारांचे शिष्टमंडळ अमेरिकेच्या दौऱ्यावर असून, संयुक्त राष्ट्रसंघाच्या 70व्या आमसभेमध्ये सुळे यांनी भाषण केले.

अन्नसुरक्षा, कृषिविकास आणि पोषण आहारासंदर्भात देशाने आतापर्यंत राबविलेली धोरणे, कृती कार्यक्रम, कुपोषणावर मात करण्यासाठी उचलली गेलेली पावले, याची माहिती सुळे यांनी दिली. 2030पर्यंत शाश्वत विकास, भूक व दारिद्य्रमुक्त जग आदींसह भारतात राबविण्यात येणाऱ्या योजनांबद्दलचे अनुभव त्यांनी या वेळी विशद केले. संयुक्त राष्ट्रसंघाने सुचविलेल्या अनेक कार्यक्रमांना भारताने वेळोवेळी अनुकूलता दर्शविल्याचेही त्यांनी नमूद केले. या दौऱ्यात खासदार राहुल कासवान, प्रा. राम गोपाल यादव, रीती पाठक, कांजीभाई गोहेल हे सहभागी झाले आहेत.


Supriya Sule, UN general meeting, Pune