Thursday, December 24, 2015

टीबी टी बी का उपचार टी बी का आयुर्वेदिक उपचार टीबी के प्रकार टी बी लक्षणे टीबी का घरेलू इलाज टीबी की जांच टी बी कैसे होता है टी बी से बचाव

आठवड्यात एका रेसिडेन्टला होतोय टीबी - 

प्रत्येक आठवड्याला किमान १०० तासांपेक्षा जास्त काम व ताणामुळे वेळी-अवेळी झोप; तसेच जेवण आणि कँटिनमध्ये मिळणारे निवृष्ट व कमी प्रथिनांच्या आहारामुळे प्रतिकारशक्ती कमी होऊन जवळजवळ प्रत्येक आठवड्याला राज्यातील किमान एका निवासी डॉक्टरला (रेसिडेन्ट) रुग्णांच्या संसर्गातून टीबी होत आहे. राज्यातील सर्व शासकीय व पालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील तब्बल ९० पेक्षा जास्त निवासी डॉक्टरांना गेल्या तीन वर्षांत छातीचा टीबी झाला असून, घाटीतील ७ निवासींनाही टीबी झाल्याचा दावा निवासी डॉक्टरांच्या 'सेंट्रल मार्ड' या संघटनेने केला आहे.
मुंबईतील जे. जे. रुग्णालयात व केईएम रुग्णालयात तीन निवासी महिला डॉक्टरांना क्षयरोग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे जवळजवळ आठवड्याच्या अंतराने तिघींना क्षयरोग झाला. यासंदर्भात 'सेंट्रल मार्ड'ने केलेल्या सर्वेक्षण व अभ्यासामध्ये राज्यातील सर्व १५ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ९० निवासी डॉक्टरांना क्षयरोग झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये टीबी झालेले अर्धे निवासी डॉक्टर हे मुंबईतील आहेत, तर अर्धे निवासी डॉक्टर उर्वरित महाराष्ट्रातील आहेत. 'सेंट्रल मार्ड'नुसार नागपूर येथील १० निवासींना, घाटी येथीलस ७, नांदेड येथील ५, पुणे येथील ६ निवासी डॉक्टरांना मागच्या तीन वर्षांत क्षयरोग झाल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे, टीबी झालेल्या निवासी डॉक्टरांपैकी एका महिला डॉक्टरचा मृत्यू झाला आहे.
निवासी डॉक्टरांसाठी कामाच्या कुठल्याच निश्चित वेळा नाहीत आणि त्यामुळे दिवस-रात्र आणि अनेकवेळा सलग कित्येक तास काम करावे लागते. परिणामी, बहुतांश निवासी डॉक्टरांना पुरेशी झोप मिळत नाही. वेळ मिळेल तेव्हाच जेवण करावे लागते आणि वेळी-अवेळी जेवण करावे लागत असल्याने बहुतेक निवासी डॉक्टरांना कँटीनचेच जेवण घ्यावे लागते. बाहेर जाऊन जेवण चांगले-पौष्टिक जेवण घेण्याची ऐपत असूनही वेळ मिळत नसल्याचे निवासी डॉक्टरांनी सांगितले. त्यातच कँटीनमध्ये जेवण सवलतीत असले तरी ते निकृष्ट असते. या सगळ्यांचा परिणाम म्हणून निवासी डॉक्टरांची प्रतिकारशक्ती कमी होत असून, प्रत्येक रुग्णालयात येत असलेल्या मोठ्या प्रमाणावरील टीबी, एमडीआर-टीबी, एक्सडीआर-टीबी रुग्णांचा संसर्ग निवासींना होत आहे.
राज्यातील किमान ९० निवासी डॉक्टरांना क्षयरोग झाल्याचे अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कामांचे तास कमी करण्याचे, अधिक प्रथिनेयुक्त आहारची सोय करण्याची विनंती मंत्र्यांकडे केली आहे
- डॉ. सागर मुंदडा, अध्यक्ष, सेंट्रल मार्ड

 टी बी का उपचार  टी बी का आयुर्वेदिक उपचार  टीबी के प्रकार  टी बी लक्षणे  टीबी का घरेलू इलाज  टीबी की जांच  टी बी कैसे होता है  टी बी से बचाव

No comments:

Post a Comment