Thursday, January 7, 2016

हा उपाय केल्याने विसरुन जाल केस गळण्याचा प्रश्न

सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक मनुष्य प्रयत्न करीत असतो. तसेच दुसऱ्यामध्येही तो सुंदरता शोधत असतो. मनुष्याची बाहेरील सुंदरता ही सर्वांना नजरेस पडते व आतील सुंदरता कोणालाच दिसत नाही. शरीरावरील प्रत्येक अवयव महत्त्वाचा असून, चेहऱ्याकडे जास्त लक्ष दिले जाते.

चेहऱ्याच्या सुंदरतेत केसांची भूमिका महत्त्वाची आहे. केसांची योग्य निगा आणि बराच काळासाठी केस चांगले राहण्यासाठी काही सोपे उपाय आहेत. हे उपाय केल्याने आपल्या केसांवर नक्कीच चांगले परिणाम होईल

पहिला प्रयोग -

दोन चमचे त्रिफळा पावडर दोन कप पाणी घेऊन उकळून घ्यावी. यानंतर पाणी थंड करून २ ते ३ वेळा त्या पाण्याने केस धुवून घेणे. यामुळे केस मुलायम आणि चमकदार होतील. आपल्या केसात कोंडा असेल तर त्रिफळा पावडर उकळताना त्यात लिंबाची पाने टाकावीत.

दुसरा प्रयोग -

आवळ्याचा पेस्ट केसांना लावून २० मिनिटांनंतर शॅम्पू लावून धुवावे. यामुळे केस मजबूत होतील. झोपण्यापूर्वी केसांना तेल लावून सकाळी उठल्यानंतर गरम पाण्यात टॉवेल बुडवून केस पुसून घ्यावीत. यानंतर शॅम्पूने धुवावीत. यामुळे केस चमकदार होतील.

तिसरा प्रयोग -

अर्धा वाटी हिरवी मेहंदी घेऊन गाईच्या दुधात टाकून त्याचा लेप बनवावा. या लेपात एक चमचा आयुर्वेदीक तेल टाकावे. हे सर्व एकत्र करून लेप ठंड होईपर्यंत हालवावा आणि केसांच्या मुळाशी लावावा. यामुळे केस गळण्यापासून मुक्ती होऊ शकते.

No comments:

Post a Comment