डोक्यावरील
त्वचेला विकार झाला तर तेथील केस गळणे स्वाभाविक आहे. तसे नसताना केस
कोणत्या भागावरून अधिक प्रमाणात गेले आहेत हे पाहून टक्कल पडण्याचे कारण
समजू शकते. कधी केस एकाच ठिकाणावरून गळालेले असतात. तर कधी सर्व
डोक्यावरचे केस गळून जातात.
काही वेळा केस गळण्याचा व शारीरिक आजाराचा संबंध असतो; परंतु बहुतेक वेळा टक्कल पडण्याचा परिणाम मानसिक अस्वास्थ्य निर्माण करण्याकडेच होत असतो. आपल्या डोक्यावरील त्वचेला विकार झाला तर तेथील केस गळणे स्वाभाविक आहे. तसे नसताना केस कोणत्या भागावरून अधिक प्रमाणात गेले आहेत हे पाहून टक्कल पडण्याचे कारण समजू शकते. कधी केस एकाच ठिकाणावरून गळालेले असतात. (लोकालाईझ्ड : localized) कधी सर्व डोक्यावरचे केस गळून जातात. (जनरलाईझ्ड … generalized) किंवा ते नर प्रवृत्तीनुसार (male patterned) गळतात. केसांची वाढ केसांच्या मुळातील एका लहान गोलाकार कांद्यावजा भागातून होते.
हेअर बल्ब (hair bulb) साधारण केस या बल्बमधून एकूण एक ते पाच वर्षांपर्यंतसुद्धा वाढत राहू शकतो, याला ऍनाजेन (anagen) स्थिती म्हणतात. वाढ थांबली की, हा बल्ब कोमेजतो. आता केस वाढण्याचे थांबते, केसाच्या वाढीची विश्रांतीची स्थिती (telogen phase) सुरू होते. ही स्थिती तीन महिने टिकते व केस गळू लागतात (catagen phase)निरामय प्रौढ व्यक्तीचे 50 ते 100 केस दररोज टेलोनेन स्थितीत जातात, म्हणजे 3 महिन्यांनी ते 50 ते 100 केस रोज गळतात. शरीरात घडणाऱ्या अनेक घटनांचा केसांच्या वाढींवर परिणाम होतो. त्यामुळे वाढीची ऍनॅजेन स्थिती संपुष्टात येते व टेलोजेन स्थिती लवकरच सुरू होते. बाळंतपण, गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर थांबविणे, कोणत्याही कारणाने ताप येणे, रक्तस्राव होणे, शस्त्रक्रिया होणे, हृदयविकाराचा झटका येणे, पक्षाघात होणे, कोणत्याही कारणाने झपाट्याने वजन कमी होणे, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होणे किंवा कोणताही मोठा मानसिक ताण येणे यांसारख्या कारणांनी टेलोनेन स्थिती मोठ्या प्रमाणात सुरू होते. असा प्रसंग येथून गेल्यावर तीन महिन्यांनी केसांची गळती सुरू होते. केस गळू लागले तरी डोक्यावरच्या त्वचेत कोणताही आजार आढळून येत नाही. केस विंचरताना मोठ्या प्रमाणात फणीवर येतात, सकाळी उशीवर केस आढळतात. प्रत्यक्ष केस मोकळे तर (निरामय स्थितीत 50 ते 100 केस मोजता येतील) मोठ्या आजारानंतर तीन महिन्यांनी हा आकडा 300 ते 400 पर्यंत जातो. हे सगळे केस परत येतात. संतुलित आहार, नियमाने केलेला व्यायाम, अंतर्बाह्य स्वच्छता आणि मानसिक स्वास्थ्य इकडे लक्ष दिले तर पुरेसे आहे. कोणत्याही औषधांची गरज नसते.
कधी कधी वाढ होण्याच्या स्थितीत, ऍनाजेन फेजमध्ये डोक्यावरील केसांची वाढ खुंटते व केस गळू लागतात. कॅन्सरच्या उपचाराकरिता वापरण्यात येणाऱ्या सायटोटॉक्झिक (cytotoxic) औषधांचा हा ज्ञात परिणाम आहे. रक्त गोठू नये म्हणून वापरण्यात येणाऱ्या अँटिकोऍग्युलंट (anticoagulant) औषधांचादेखील असा दुष्परिणाम होणे संभवते. जीवनसत्व अ दीर्घकाळ अतिरेकाने सातत्याने घेत राहण्यानेदेखील असाच दुष्परिणाम होणे शक्य आहे. काही व्यक्तींना "मल्टिव्हिटॅमिन'ची एक गोळी घेण्याने आपली प्रकृती सुधारले असे वाटते, तर काहींना जीवनसत्व अ घेण्याने आपली दृष्टी चांगली राहील असे वाटते. हे भ्रम आहेत. उलटपक्षी या गोळ्यातील काही रेणू दीर्घकाळ घेण्याने शरीरात साचतात व अपायकारक ठरतात हे ध्यानात ठेवले पाहिजे. संपूर्ण डोक्यावरचे केस जाण्याच्या कारणामध्ये काही अंतर्ग्रंथींचे आजार असतात. थॉयरॉईड ग्रंथीचे कार्य नीट न झाल्यास मिक्झिडिया (myxoedema) हा विकार जडतो. डोक्यावरचे केस विरळ होऊ लागतात. चेहरा सुजतो, आवाज बसतो, मलावरोध होण्याची प्रवृत्ती होते. थंडी फार वाजते. सर्व हालचाली संथ होऊ लागतात. खिन्नता जाणवू लागते. या आजारावर चांगले उपचार करता येतात. आजाराचे निदान रक्तातील ढडक या संप्रेरकाच्या वाढलेल्या पातळीवरून करता येते. मेंदूच्या तळाशी असणाऱ्या पिट्युटरी ग्रंथीचे काम नीट न झाल्यास हायपोपिट्युटॅरिझम (hypopituitarism) हा विकार होतो.
पिट्युटरी ग्रंथी सर्व अंतर्ग्रंथींच्या कामावर ताबा ठेवते. स्वाभाविकपणे पिट्युटरी ग्रंथीचे कार्य नीट न झाल्याने सगळ्याच अंतर्ग्रंथी अकार्यक्षम होतात. थॉयरॉईड ग्रंथीचेदेखील कार्य नीट होत नाही. तथापि, ढडक ची पातळी वाढत नाही. शिवाय हायपोपिट्युटॅरिझमध्ये स्त्रियांप्रमाणे पुरुषांच्या चेहऱ्यांवरील केस नाहीसे झालेले असतात. चेहऱ्यावरील त्वचेला सुरकुत्या पडतात. शरीरातील त्वचा मऊ असते. केसदेखील नरम असतात. मिक्झिडीमामध्ये त्वचा खरबरीत असते आणि केस राठ असतात. मिक्झिडीमामध्ये आवाज जाड आणि बसलेला असतो, तर हायपोपिट्युटॅरिझममध्ये आवाजात फरक पडलेला जाणवत नाही. बाळंतपणाच्या वेळेस अतिरेकी रक्तस्राव होणे हे पिट्युटरी ग्रंथीचे कार्य थांबण्याचे कारण असते.
आपल्या मानेमध्ये पॅराथॉयरॉईड नावाच्या ग्रंथी असतात. शरीरातील कॅल्शियमच्या चयापचयावर या ग्रंथीचा मोठाच प्रभाव असतो. या ग्रंथीचे काम कमी झाल्यास हायपोपॅराथॉयरॉयडिझम (hypopara thyradism) हा विकार होतो. पाठ दुखते. पाठीचा कणा वाकेनासा होतो. लहान वयात मोतिबिंदू होतो. काहींना फिट्स येतात. अनेकांना हातापायाची बोटे वेडीवाकडी होण्याचे झटके (tetany) येत राहतात. हायपोपॅराथॉयरॉयडिक्स असणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यावरील केस विरळ होत जातात. या सर्व आजारात लवकरात लवकर निदान होणे महत्त्वाचे आहे. कारण एकदा केस गळण्यावर योग्य उपचार करूनदेखील पूर्वीसारखा केशसंभार परत येईल असे नसते.
मस्तकावरील त्वचेला झालेल्या आजाराने केसांच्या मुळांना अपाय होणे स्वाभाविक आहे. अगदी लहान अर्भकांच्या डोक्यावरील विशिष्ट जागेवरचे केस उशीवर डोके घासून घासून गळून पडतात. कारण त्यांना डोक्याला एटॉपिक एक्झिमा (atopic eczema) होतो. अशा विकारांना दीर्घकाळ उपाय करावे लागतात. म्हणून स्टेरॉईड्स असणारी मलमे जपून वापरावीत. प्रौढांच्या डोक्यावरील त्वचेला बुरशीमुळे दाह होतो. टिनिया कॅपिटिस (tinea capitis) डोक्यात जिवाणूंमुळे लहान लहान पुटकुळ्या आल्या तर त्या-त्या ठिकाणचे केस गळून जातात. अर्थात कोणत्याही प्रकारचा त्वचेचा आजार दिसला तर त्याचे निदान करून योग्य उपचार केल्याशिवाय केस गळणे थांबणार नाही हे उघडच आहे. डोक्यात कोंडा होणे हे केस गळण्याचे नेहमी आढळणारे कारण होय. त्वचेच्या आवरणातून मृत पेशींचे पुंजके बाहेर टाकले जातात. या मृत पेशींमध्ये काही जिवाणू आणि बुरशीसदृश्य किटाणूंमुळे दाह होतो, खाज सुटते. या खवल्यांमधील जिवाणूंमुळे हे खवले खांद्यावर व पाठीवर पडतात तेव्हा तिथेही आग होते व तेथे पुरळ उठते. कोंडा निर्माण होण्याचे महत्त्वाचे कारण "सिबॉरिक' (seborrhocic) प्रकारचा त्वचेचा विकार होणे. हा का होतो हे अद्याप कळत नाही. याच्या उपचारात पोटात घेण्याची औषधे क्वचितच लागतात. सॅलिसिलिक ऍसिड, सेलेनियम सल्फर आणि टार असणारा शॅम्पू वापरण्याने फायदा होतो. कोमट पाण्याने डोके धुऊन शॅम्पू चांगला चोळावा. दोन ते तीन मिनिटे शॅम्पू डोक्यावर लागलेला ठेवावा व मग डोके धुवावे. हे सुरवातीला रोज करावे. एकदा कोंडा गेल्यावर आठवड्यातून एक किंवा दोन वेळा शॅम्पू वापरावा.
बऱ्याच वेळा केस गळून पडण्याची कारणे सापडत नाहीत. ऍलोपेशिया एरिआटा (alopecia areata) या विकारात एका भागावरील केस अकस्मात गळून टक्कल पडते. ऍलोपेशिया टोटॅलिस (alopecia totalis) या विकारात थोड्याच दिवसांत संपूर्ण डोक्यातील केस गळून पडतात. क्वचित ऍलोपेशिया युनिव्हर्सलिस (alopecia universelis) होतो. यात डोके, भुवया, दाढी, मिशा, छाती व हातापायाचेसुद्धा केस गळून पडतात. या विकारांचे कारण कळत नाही; परंतु बऱ्याच रुग्णांचे केस परत येतात हा दिलासा आहे. याला एक वर्ष लागते. कदाचित मानसिक तणाव या आजाराला कारणीभूत असेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. नर प्रवृत्तीच्या टकलावर उपाय नसतो, असे टक्कल रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांनाही पडू शकते.