मासिक पाळीतील समस्या
मुलगी वयात आल्यावर पाळी सुरु होते हे आपण मागील एका लेखात वाचलेच आहे. मासिकपाळी संबंधी समजात काय गैरसमज आहेत आणि ते कसे निरर्थक आहेत हेही आपण वाचले आहे. आता मासिकपाळी संबंधी अनेक स्त्रियांना असलेल्या समस्या व तक्रारींचा येथे विचार करू.-
पाळीच्यावेळी वेदना होणे: सर्वच स्त्रियांना काही
वेळेस पाळीच्या वेळेस वेदना होतात. परंतु व्यक्तिगणिक यांची तीव्रता सौम्य
ते असह्य अशी बदलत असते. यात काही जणींना मळमळ आणि उलट्या होणे असे त्रासही
होतात. युटेरसच्या आकुंचनामुळे आणि काही रसायनांच्या स्त्रावामुळे या
वेदना होतात.
वय वाढत जाते तसे या वेदना कमी होत जातात. पाळीच्या वेळी वेदना कमी होण्यासाठी नियमित व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो कारण यामुळे शरीरात असलेली नैसर्गिक वेदना शामक रसायने सक्रीय होतात. वाढत जाणारी वेदना आणि अस्वस्थ करणारी मासिक पाळी ही काहीवेळेस निराशा आणि चिंता या मानसिक आजारांची लक्षणेही असू शकतात. जर अशीच परिस्थिती आहे असे तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या डॉक्टरांना भेटा कारण निराशेवर उपचार केल्यास बऱ्याचवेळेस तिच्याशी संबंधित शारीरिक समस्याही आपोआप ठीक होतात.
-
अनियमित मासिक पाळी: का कुणास ठाऊक परंतु
त्यांच्या संपूर्ण आयुष्यात काही स्त्रियांना मासिक पाळी नियमितपणे येत
नाही. हा त्रास सामाजात वावरतांना समस्या निर्माण करू शकतो कारण यामुळे
त्यांना सुट्ट्या, आपल्या जवळच्या लोकांच्या भेटी किंवा इतर महत्त्वपूर्ण
कार्यक्रमांचे नियोजन करता येत नाही. याबरोबरच त्यांना गर्भ राहण्यासंबंधी
नियोजन करण्यासही अवघड जाते.
या अनियमितपणाची कारणे खालीलप्रमाणे असू शकतात.
1. ताणतणाव
2. गर्भपाताच्या गोळ्या घ्यायला सुरुवात केल्यावर किंवा त्यांच्यात बदल केल्यावर
3. गर्भारपणात/गर्भपात झाल्यास
4. आहार अचानक केलेला बदल – याबरोबर वजनात अचानक वाढ किंवा घट होणे
5. संप्रेरकांचे असंतुलन (harmonal imbalances) इत्यादी.
जर तुमची पाळी अनियमितपणे येत असेल तर योग्य आणि चांगला आहार घेण्याकडे आणि नियमित व्यायाम करण्याकडे लक्ष द्या. अनेक कारणांमुळे येणाऱ्या ताणाचा उदा. परीक्षा, काम, नातेसंबंध किंवा गर्भ राहण्याची भीती, तुमच्या मासिक पाळीच्या नियमिततेवर परिणाम होऊ शकतो. काही वेळेस मधल्या काळात होणारा रक्तस्त्राव हा कॅन्सर चा प्रकारही असू शकतो म्हणून आपल्या डॉक्टरांना यासंबंधी भेटणे योग्य होईल.
पाळी चुकते तेव्हा दुर्
- मासिक पाळीतील समस्या
- मासिक पाळीसंबंधी...
- मासिकपाळी- एक शारीरिक क्रिया
लक्ष करू नका
पाळी अजिबात न येणे: यात दोन प्रकार आहेत. पहिला वयात आल्यावरही पाळी सुरुच न होणे आणि दुसरा आणि अधिक आढळून येणारा म्हणजे पाळी सुरु तर होणे परंतु अचानकपणे सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ पाळी न येणे. याची अनेक कारणे आहेत जसे-
1. गर्भ राहणे
2. उशिरा वयात येणे – हे कौटुंबिक इतिहासावर अवलंबून असते
3. खूप कमी वजन असणे – पाळी येण्यासाठी तुमच्या शरीराच्या वजनात चरबीचे प्रमाण कमीतकमी १५% असले पाहिजे. कुपोषण, खूप व्यायाम, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यांमुळे हे प्रमाण कमी होऊ शकते. यामुळे तुम्हाला तुमच्या हाडांची झीज करणारा “ऑस्टीऑपोरोसीस” हा आजारही होऊ शकतो. परंतु वजनात चरबीचे प्रमाण बरोबर राखले गेले तर पाळी सुरु होऊ शकते.
4. संप्रेरकांसंबंधी समस्या – ताणतणाव, जास्तीचे वजन, इत्यादी कारणांमुळे
5. अंडाशयासंबंधी समस्येमुळे रजोनिवृत्ती लवकर होणे
6. याचप्रमाणे “पॉलिसीस्टिक ओवेरीअन सिंड्रोम”, योनिचीद्राचा पडदा अखंड असणे इत्यादी कारणांमुळेही पाळी न येण्याची किंवा थांबण्याची समस्या उद्भवू शकते.
पाळीच्या वेळेस जास्त रक्तस्त्राव होणे: पाळीच्या काळात साधारणपणे २० ते ८० मिलीलीटर रक्त जाते. यापेक्षा जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे चेहरा पिवळा व निस्तेज पडणे, थकवा जाणवणे, चालणे कठीण होणे, दम लागणे ही लक्षणे दिसून येतात. जास्त रक्तस्त्रावामुळे अनॅमियाही होऊ शकतो. जास्त राक्त्स्त्रावाची बरीच कारणे आहेत यात गर्भपात, रक्त लवकर न गोठणे, ओटीपोटात संसर्ग होणे इत्यादींचा समावेश होतो. या शिवायही अनेक कारणे असू शकतात. त्यासंबंधी तुमचे डॉक्टरच योग्य निदान करू शकतात.
तुम्हाला जर पाळी संबंधी कुठलीही तक्रार असेल तर तुम्ही डॉक्टरांना भेटणेचा योग्य राहील. तुमच्या पाळी संबंधीच्या सर्व नोंदी जसे – पाळीच्या तारखा, पाळी किती काळ चालली, किती रक्तस्त्राव झाला, याचबरोबर लैंगिक संबंधाच्या वेळी किंवा नंतर रक्तस्त्राव होतो का – एका डायरीत लिहून ठेवल्यास तुमच्या डॉक्टरांना उपचार करायला मदत होईल.